26 thousand in Akola Crops per hectare affected 
मुख्य बातम्या

अकोल्यात २६ हजार हेक्टरवरील पिके बाधित

अकोलाः या हंगामात सुरवातीपासूनच संकटांशी सामोरा जात असलेल्या शेतकऱ्याला वर्ष मावळतीला जात असतानाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. मंगळवारी (ता.२८) आलेल्या गारपिटीत तब्बल २६ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे.

टीम अॅग्रोवन

अकोलाः या हंगामात सुरवातीपासूनच संकटांशी सामोरा जात असलेल्या शेतकऱ्याला वर्ष मावळतीला जात असतानाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. मंगळवारी (ता.२८) आलेल्या गारपिटीत तब्बल २६ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे. याबाबत प्रशासनाने प्राथमिक अहवाल तयार करीत शासनाकडे सादर केला आहे.

मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट झाला. अर्धा तास गारपीटही झाली होती. यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, कांदा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाची प्राथमिक माहिती यंत्रणांनी गोळा केली. चारच तालुक्यात सुमारे २५ हजार ९५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हरभरा, तूर, गहू, कपाशी, भाजीपाला, कांदा आदी पिके बाधित झाली. अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व पातूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. 

या चार तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय यंत्रणांना यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार नुकसानग्रस्त शेती क्षेत्राचे संयुक्त पंचनामे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत करण्यात केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती संबंधित कंपनीला द्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. गारपिटी, पावसामुळे अकोला तालुक्यात १२ हजार ५४५ हेक्टर, बार्शीटाकळी १ हजार ७४, मूर्तिजापूर २ हजार ६०० आणि बाळापूर तालुक्यात ९ हजार ५७१ तर पातूर तालुक्यात १६० असे एकूण २५ हजार ९५० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. 

‘शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये’

अवकाळी पाऊस व गारपिटीने ज्या शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे नुकसान झाले असेल तर खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा पालकमंत्री बच्चू कडू यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT