मुख्य बातम्या

राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१; २६ रुग्ण बरे होऊन घरी

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून असता राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.   सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो करोना मुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ६ झाली आहे.    राज्यातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे - 

  • मुंबई    - ७३     (मृत्यू ५)
  • सांगली    - २४    
  • पुणे मनपा -    १९    
  • पिंपरी चिंचवड - १२    
  • नागपूर -    ११    
  • कल्याण - डोबिवली - ७    
  • नवी मुंबई    - ६ (मृत्यू १)    
  • ठाणे - ५    
  • यवतमाळ, वसई विरार     - प्रत्येकी  ४
  • नगर     -  ३
  • सातारा, पनवेल    प्रत्येकी - २
  • उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, ,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया -    प्रत्येकी - १    
  • इतर राज्ये - गुजरात    १    
  • एकूण    - १८१ (मृत्यू ६)    
  • मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू राज्यात शनिवारी (ता.२८) एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात शनिवारपर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT