reshim kosh  
मुख्य बातम्या

पूर्णा मार्केटमध्ये २५० टन रेशीम कोषांची खरेदी 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष मार्केटमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षात २५० टन रेशीम कोषांची खरेदी झाली आहे.

टीम अॅग्रोवन

परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष मार्केटमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षात २५० टन रेशीम कोषांची खरेदी झाली आहे. यातून सुमारे ७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या मार्केटमुळे परभणी, हिंगोली, नांदेडसह विदर्भातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ मिळाली आहे. यामुळे वाहतूक खर्च, वेळची बचत होत आहे.

परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत रेशीम शेतीचा चांगला विस्तार झाला आहे. खात्रीच्या उत्पन्नामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. या तीन जिल्ह्यांत सुमारे २ हजार एकरावर तुती लागवड आहे. परंतु या भागातील शेतकऱ्यांना राज्यात जवळचे मार्केट नसल्यामुळे कर्नाटकातील बंगळूर जवळील रामनगरम किंवा तेंलगणातील जंगम येथील मार्केटमध्ये कोष विक्रासाठी न्यावे लागत. त्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूक खर्च तसेच वेळ लागत असे. जालना येथे रेशीम कोष मार्केट सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना मार्केटची सुविधा झाली. सन २०१९ च्या डिसेंबर महिन्यात पूर्णा येथे रेशीम कोष मार्केट सुरू झाल्यापासून या तीन जिल्ह्यांसह बीड तसेच विदर्भातील वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकरी कोष विक्रीस आणत आहेत.  गतवर्षी लॉकडाउनमुळे रेल्वे वाहतूक बंद होती. त्यामुळे कोषाचे दर कमी झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी कोष वाळवून पूर्णा येथील मार्केटमध्ये विक्री केली. चालू आर्थिक वर्षात या मार्केटमध्ये प्रतिकिलो सरासरी २५० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. आजवर २५० टन (२ लाख ५० हजार किलो) रेशीम कोषाची खरेदी झाली आहे. त्याद्वारे ७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असे मार्केटचे संचालक डॉ. संजय लोलगे यांनी सांगितले. संचारबंदीत कोष मार्केट सुरू ठेवा सध्या या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या रेशीम कोष उत्पादनाच्या बॅच सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे रेशीम कोष काढणी सुरू आहे. परंतु जिल्ह्यात एक एप्रिलपर्यंत संचारबंदी आल्यामुळे कोष खरेदी बंद आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे संचारबंदीच्या काळात कोरोनाच्या नियमांचे पालन करून रेशीम कोष मार्केटमधील व्यवहार सुरू ठेवण्यास सूट देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT