cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय) कापसाची या आठवड्यात खरेदी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यातच चोपडा (जि. जळगाव) येथील खरेदी केंद्रात कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण सांगून क्विंटलमागे दोन ते पाच किलोची कटती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.  या आठवड्यात एकामागून एक खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. जळगाव तालुक्यासाठी पाच जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये खरेदी सुरू आहे. परंतु या केंद्रांसाठी एकच ग्रेडर आहे. यामुळे रोज कुठल्यातरी एका केंद्रात खरेदी केली जाते. रोज सर्वच केंद्रांत खरेदी केली जात नाही. यामुळे संबंधित एकाच केंद्रात वाहनांची मोठी गर्दी होते. तसेच विक्रीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रात रात्रभर थांबावे लागते. दुसऱ्या दिवसापर्यंत खरेदी पूर्ण करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना हकनाक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच कारखान्यालाही आपली यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरात आणता येत नाही, अशी स्थिती आहे. यामुळे जळगाव, जामनेर व इतर तालुक्यांत निश्‍चित सर्वच केंद्रांमध्ये रोज खरेदी केली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  जळगाव जिल्ह्यात सीसीआयने जामनेर, शेंदूर्णी (ता.जामनेर), पहूर (ता.जामनेर), बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमध्ये शहादा व नंदुरबार येथे खरेदी सुरू केली आहे. जळगावमध्ये रावेरात खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. पणन महासंघ ‘सीसीआय’चा एजंट म्हणून खरेदी करणार आहे. परंतु महासंघाची खरेदी सुरू झालेली नाही. महासंघाने जळगाव जिल्ह्यात भडगाव, धरणगाव, अमळनेर, यावल, पारोळा येथे खरेदीचे नियोजन केले आहे. तर धुळ्यात धुळे व नाशिक जिल्ह्यांतील येवला व मालेगाव येथेही खरेदी केंद्र निश्‍चित केले आहे. खरेदी मात्र सुरू झालेली नसल्याने या तालुक्यातील कापसाची आवक जळगाव, पाचोरा, चोपडा, भुसावळ, जामनेर येथील सीसीआयच्या खरेदी केंद्रात होत आहे. क्विंटलमागे पाच किलोपर्यंत कटती चोपडा येथील खरेदी केंद्रात कापसात ओलावा सांगून क्विंटलमागे दोन ते पाच किलो कटती लावली जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच दरही ५७०० रुपये प्रतिक्विंटल दिला जात नाही. व्यापारी शेतकऱ्यांच्या नावे कापसाची विक्री या केंद्रात करीत आहेत. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर व इतरांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT