watermelon and  muskmelon
watermelon and muskmelon 
मुख्य बातम्या

पुणे : कलिंगड, खरबूज उत्पादकांचे  २५ ते ३० कोटींचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

पुणे ः लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील कलिंगड आणि खरबूज उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना प्रतिकिलो पाच ते दहा रूपयाने विक्री करावी लागली. यामुळे एकरी दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत २५ ते ३० कोटींचा फटका बसला आहे. 

पुणे जिल्ह्यात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर कलिंगड आणि खरबूजाचे पीक घेतले आहे. पुणे जिल्हयात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती अशा तालुक्यांमध्ये कलिंगड, खरबूजाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सध्या पीक काढणीला आले असून लॉकडाऊनमुळे वाहतुकीच्या अडचणी, ग्राहकांचा कमी प्रतिसाद, कमी दर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

मागील वीस ते पंचवीस दिवसापूर्वी कलिंगड, खरबूजाचे उत्पादन सुरू झाले होते. एकरी सरासरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते. लॉकडानच्या आधी कलिंगडाला प्रतिकिलो १० ते १३ रूपये, तर खरबूजाला १८ ते २२ रूपये दर मिळत होता. तर उन्हाळी हंगामात एप्रिल, मे, जून महिन्यात कलिंगड प्रतिकिलो १५ रूपये, तर खरबूज २५ रूपयांपर्यत दर मिळतो. मात्र, सध्या कलिंगडाला प्रतिकिलो ४ ते ५ रुपये आणि खरबूजाला ६ ते १० रूपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान होत आहे. 

शेतकरी सचिन शिंदे म्हणाले, की मी जानेवारीमध्ये खरबूजाची अडीच एकरावर लागवड केली होती. कोरोनाच्या आधी साधारणपणे प्रति किलोला २० ते २५ रूपये एवढा दर मिळत होता. परंतु कोरोनानंतर या दरात घट झाली. त्यामुळे काढलेले खरबूज घरोघरी जाऊन २०० रूपये कॅरेटने (१८-२० किलो) विक्री केली. त्यामुळे अडीच एकरातून अवघे २४ हजार रूपये मिळाले. त्यासाठी ८७ हजार रूपये खर्च झाला होता. तर एकरी सुमारे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.  कलिंगड, खरबूज उत्पादन घेणारे तालुके  जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT