अकोल्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची २४ कोटींची मदत
अकोल्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची २४ कोटींची मदत 
मुख्य बातम्या

अकोल्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची २४ कोटींची मदत

टीम अॅग्रोवन

अकोला  : या हंगामात अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी दिलासा देण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. जिल्ह्यात ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांना २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपये मदत जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे. हा निधी दोन दिवसांपूर्वी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी २४ कोटी ५ लाख ७९ हजार रुपये निधी बँकांकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.  यंदा जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी तसेच वेळोवेळी आलेल्या पुरांमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या काळात जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ४१ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातून मूग, उडदाचे संपूर्ण पीक गेले. सोयाबीन पिकानेही दगा देत शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसुल झालेला नाही. कापसावरही बोंडअळी आलेली आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजचा निधी जिल्ह्याच्या वाट्याला २६ कोटी ७८ लाख रुपये आला आहे. 

तालुकानिहाय असा मिळाला निधी अकोला तालुक्याला पाच कोटी ६६ लाख ३ हजार, बार्शी टाकळी एक कोटी ४२ लाख ९५ हजार, अकोट पाच कोटी १८ लाख २२ हजार, तेल्हारा तीन कोटी १८ लाख ७ हजार, बाळापूर ७ कोटी २७ लाख ७८ हजार, पातूर एक कोटी ६२ लाख २७ हजार, मूर्तीजापूर २ कोटी ४३ लाख ४१ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना देण्यात आला आहे. हा निधी ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील सर्वाधिक ७ हजार १३४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय तेल्हारा ५१३६, पातूर ४४६४, मूर्तीजापूर ३२४०, बार्शी टाकळी ३६४३, अकोला ४१५६, अकोट ४८६५ लाभार्थी शेतकरी आहेत. बँकांना वितरीत केलेला निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

SCROLL FOR NEXT