सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाळा होणार बंद
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाळा होणार बंद 
मुख्य बातम्या

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाळा होणार बंद

टीम अॅग्रोवन

सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. २०१६-१७ च्या तुलनेत यंदा साडेसात हजारांनी पटसंख्या घटल्याने २३ शाळा कमी झाल्या आहेत. २३० शिक्षक अतिरिक्‍त झाल्याची स्थिती आहे.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षण हा पाया असतो. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी वर्ग-१ चे अधिकारी झाले आहेत. तसेच अनेकजणांना शासकीय नोकरीही मिळाली आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस नियोजनाची अपेक्षा आहे. जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पालकांना खात्री होईल आणि पटसंख्या वाढेल. मात्र, ब्लेझर की ड्रेसकोड यामध्येच प्रशासनाला रस असल्याचे मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळाले. दरम्यान, शिक्षक व प्रशासन यांच्यातील वादही लोकांनी पाहिला. त्यात आता शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

बंद झालेल्या शाळा

सुपनरवस्ती, रड्डे (ता. मंगळवेढा), कणबस गं., बालाजीनगर, कुंभारी (द. सोलापूर), चौलगी वस्ती, जेऊर, उन्नदवस्ती, तोळणूर (अक्‍कलकोट), कुरणवाडी, माळीवस्ती, कंदर उर्दू शाळा (करमाळा), इमडे-गावडे वस्ती, घेरडी, आलदर-वगरे वस्ती, शिंदेवस्ती (सांगोला), डोंगरे वस्ती (पंढरपूर), अंजनगाव उर्दू शाळा (माढा) यासह आणखी पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT