milk
milk  
मुख्य बातम्या

भंडारा : दूध संघांचे १८ कोटींचे चुकारे अडले

टीम अॅग्रोवन

भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे गेल्या १६० दिवसांचे चुकारे अडविल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. १८ कोटी रुपयांची ही रक्‍कम तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जिल्हा दूध संघाला घेराव घालण्यात आला. थकीत र‍कमेसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात धानाची लागवड होते. एकाच पिकावर भिस्त असल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा अतिरिक्‍त स्रोत म्हणून दुग्ध व्यवसायावर भर दिला आहे. जिल्ह्याची दुधाची उलाढाल ४०० कोटी रुपयांच्या घरात आहे. भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय सुमारे १०० कोटी रुपयांचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध उत्पादक संस्था असून, त्या दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे. असे असताना जिल्हा सहकारी दूध संघाने एप्रिल २०१९ पासून संस्थांचे देयक अडविण्याचा प्रकार घडला आहे.  या प्रकारामुळे संस्थांसमोरील आर्थिक कोंडी वाढली आहे. अनेक लहान संस्था बंद पडल्या. त्यानंतरही त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही. या संस्थांचे १६० दिवसांचे अर्थात १६ आठवड्याचे देयक तातडीने देण्यात यावे. याकरिता दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचा आरोप आहे. या विरोधात संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध उत्पादकांनी संघाला घेराव घातला. या वेळी दुधाचे थकीत देयकाची रक्‍कम न मिळाल्यास दुधाचा पुरवठा संघाला न करण्याचा इशारा देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT