1734 crore required for compensation
1734 crore required for compensation 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४ कोटींची गरज

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १७३४ कोटी ६२ लाख ९४ हजार रुपयांची आवश्यकता आहे,’’ अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. पंचनाम्यांअंती मराठवाड्यातील पीक नुकसानीचे क्षेत्र २४ लाख ६२ हजार ४९३ हेक्टरवर पोहोचले आहे.

यंदा मराठवाड्यात जादा पाऊस झाला. जून ते ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे २४ लाख ९५ हजार ९०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कोरडवाहू आश्वासित सिंचनाखालील ३५ लाख २१ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या २४ लाख ६२ हजार ४९३ तसेच बहुवार्षिक पिकाखालील ४७ हजार ७३९ शेतकऱ्यांच्या ३३ हजार ४०७ हेक्टर पीकक्षेत्राचा समावेश आहे. 

कोरडवाहू आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ६८०० प्रमाणे १६७४ कोटी ४९ लाख ५५ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानभरपाईसाठी हेक्टरी १८ हजार प्रमाणे ६० कोटी १३ लाख ३९ हजार रुपयांची आवश्यकता आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील १५१ व बीड जिल्ह्यातील दोन मिळून १५३ गोठ्यांचेही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. आठ जिल्ह्यातील ४३१८ कच्च्या व १९६ घरांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. 

औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील १० कच्चा घरांचे पूर्णतः नुकसान झाले. २०३० कुटुंबांना कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानुग्रह अनुदान देण्यासाठी निधीची आवश्यकता असेल. ९४१ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यासाठीही निधी आवश्यक आहे. ६७ गावांतील ६७ व्यक्तींचा जून ते ऑक्टोबर दरम्यान नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला आहे. ६८२१ हेक्‍टर जमीन नदीपात्राने प्रवाह बदलल्यामुळे वाहून गेली.

जिल्हानिहाय पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये)

औरंगाबाद २६५७९९.३९
जालना ४९३१०६.७९
परभणी १७९९९८.५१
हिंगोली २२७०६८.९९
नांदेड  ५६४५१९.४६
बीड २५५८०५.७५
लातूर २५००८७.२
उस्मानाबाद २५९५१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT