fruit
fruit 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे आणि कांदा बटाटा आवक 

टीम अॅग्रोवन

पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरातील फळे आणि कांदा बटाट्याची टंचाई जाणवू नये यासाठी पुणे बाजार समितीच्या प्रयत्नांना दुसऱ्या दिवशीही यश आले. सोमवारी (ता.३०) फळे आणि कांदा बटाटा विभागात २८३ वाहनांमधून तर उपबाजारात ३०५ अशा ५८८ वाहनांमधून १७ हजार क्विंटल आवक झाली होती. यावेळी बाजारात व्यवहार संथ पण सुरळीत झाले.  याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख म्हणाले, कि आपत्कालीन आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बाजार सुरु ठेवण्याच्या नियोजनानुसार सोमवारी (ता.३०) भाजीपाला विभाग बंद ठेवून कांदा बटाटा आणि फळांचा विभाग सुरु ठेवला होता. या नियोजनानुसार १६३ लहान मोठ्या वाहनांमधून फळांची तर १२० वाहनांमधून कांदा बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बाजार संथ पण सुरळीत सुरु होता. फळ विभागात प्रामुख्याने संत्री, कलिंगड, खरबुजाची मोठी आवक झाली होती. तर सर्वच शेतमालाचे दर स्थिर होते. आवकेमुळे शहरात आता फळांची देखील मुबलक उपलब्धता होत असून, कृत्रिम भाववाढ रोखण्यास मदत होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी चढ्या दराने खरेदी करु नये तर विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री करु नये, तसे केल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पणन संचालक सुनील पवार यांनी बाजार आवाराला भेट देऊन समितीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती देत, अहवाल शासनाला सादर केला आहे.  फुल बाजार १५ एप्रिल पर्यंत बंदच  कोरोना विषाणूचा वाढता फैलाव आणि बाजार समितीमधील फुल विभागाची मर्यादित जागा आहे. यामुळे गर्दी नियंत्रित करणे शक्य नसल्याने, कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी खबरदारी म्हणून 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT