समृद्धी भूसंपादनासाठी १५ नोव्हेंबरचा अल्टिमेटम
समृद्धी भूसंपादनासाठी १५ नोव्हेंबरचा अल्टिमेटम 
मुख्य बातम्या

समृद्धी भूसंपादनासाठी १५ नोव्हेंबरचा अल्टिमेटम

टीम अॅग्रोवन

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असा अल्टिमेटम सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी दिला आहे. त्यामुळे तातडीने निवाडे निकाली काढण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली असून, दिवाळीनंतर समृद्धी महामार्गाच्या बांधणीचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.

 समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गासाठी जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी दर्शविलेला विरोध, त्यातून उभा राहिलेला संघर्ष, भाऊबंदकीचे वाद आदी अडचणींमुळे अजूनही १०० टक्के जमिनींचे संपादन होऊ शकलेले नाही. जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमधून हा महामार्ग जात असून, शिवडे हे या महामार्गाला सर्वाधिक विरोध करणारे गाव ठरले आहे. परंतु, हा विरोध शमविण्यास प्रशासनाला यश आले असून, महामार्गासाठी आवश्यकता असलेल्या सर्व जमिनींच्या गटांची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

या महामार्गासाठी जिल्ह्यात अजूनही २० टक्के जमिनीचे अधिग्रहण होऊ शकलेले नाही. सिन्नर तालुक्यातील २५ गावांत ४०३ गटांमधील १३६.५९ हेक्टर जमिनीचे संपादन होणे बाकी आहे.

इगतपुरीतील २३ हेक्टर जमिनीची गरज महामार्गावरून इंटरचेंज करण्यासाठी गोंदे येथील २६ गटांमधील २२.९१ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. इगतपुरीतील पेसा क्षेत्र वगळून इतर वर्ग-१ च्या जमिनीपैकी २७ गटांतील शेतकऱ्यांचे कौटुंबिक व तत्सम वाद आहेत. त्यामुळे १०.५६ हेक्टर क्षेत्र अजूनही संपादित होऊ शकलेले नाही. शेतकऱ्यांनी संमतीने हे क्षेत्र दिल्यास पाचपट, तर भूसंपादन कायद्यान्वये संपादित केल्यास शेतकऱ्यांना चारपट परतावा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT