राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढले
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढले 
मुख्य बातम्या

राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढले

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा १५ लाख मॅट्रिक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. केंद्र, राज्य पातळीवर प्रलंबित असणाऱ्या निर्णयाचा फटका आता पुढील हंगामात बसण्याची शक्यता आहे. साखरेचे दर वाढत नसल्याने राज्यातील कारखान्यांची पुढील हंगामात ही किमान ‘एफआरपी’ची रक्कम देताना कसरतच होणार आहे.  राज्यात सध्या गळीत हंगाम हळूहळू अंतिम टप्‍प्यात येत आहे. कमी क्षमतेचे कारखाने बंद होत आहेत. कारखाने बंद होताना ही कारखान्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने उत्पादकांची बाकी ठेवूनच कारखाने बंद होत आहेत. याबाबतीत धोरणात्मक निर्णय न झाल्यास थकबाकीचा हा ''धोंडा'' पुढील हंगामातपर्यंत कायम राहण्याची भीती आहे. ज्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात झाली त्या ऊस उत्पादकांना प्रामुख्याने कारखान्याची थकबाकी लवकर मिळण्याची शक्यता धूसर बनत आहे. साखरेच्या उत्पादनात व दर देण्यात आघाडीवर असणाऱ्या कारखान्यांचीच अवस्था केविलवाणी होत असल्याने राज्यातील इतर भागांतही  कारखाने आणि उत्पादक या दोघांची अवस्था बिकट झाली आहे. राज्यात मार्चच्या पहिल्या सप्ताहाअखेर ७७९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ८७ लाख मॅट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार या कालावधीपर्यंत ६५० लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप होऊन त्यातून ७२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता. म्हणजे अंदाजानुसार सुमारे १५ लाख मॅट्रिक टन साखर जादा प्रमाणात तयार झाली आहे. यात पुन्हा वाढच होण्याची शक्यता आहे. हंगाम संपेपर्यंत अंदाजापेक्षा ४० लाख टन साखरेचे जादा उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्‍यक्‍त केला. पुढील हंगामातही उसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने अतिरिक साखर साठा ही कारखान्यांची डोकेदुखी बनण्याची शक्यता साखर उद्योगातून व्‍यक्‍त होत आहे. स्पर्धा जाणवली नाही.. यंदा ऊसतोडणी कामगार कमी आले आहेत. त्यातच साखरेच्या दरात स्थिरता नसल्याने कार्यक्षेत्र सोडून कारखान्यांनी ऊस नेण्याचा प्रयत्न केला नाही यामुळे अपेक्षित स्पर्धा जाणवली नाही. स्वतःकडे नोंदणी केलेल्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठीच कारखाने झगडत असल्याचे दृश्‍य ऊसपट्यामध्ये आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT