14 lakhs in Western Maharashtra Consumer power supply will be interrupted 
मुख्य बातम्या

पश्चिम महाराष्ट्रातील १४ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार

सोलापूर ः गेल्या दहा महिन्यांपासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्यात येईल.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘‘गेल्या दहा महिन्यांपासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्यात येईल’’, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार आदी उपस्थित होते. 

सद्यःस्थितीत पुणे (१०३२.८० कोटी), सातारा (१४०.३६ कोटी), सोलापूर (२५९.१२ कोटी), सांगली (१९२.५४ कोटी) व कोल्हापूर (३३७.४३ कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण १९६२ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी गेल्या १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. 

कृषिपंप वीजजोडणीबाबत जनजागृती करा  पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पायाभूत वीज वितरण यंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा ठिकाणच्या व कोटेशन भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक नवीन वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात. कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधील विविध योजनांसाठी जनजागृती करा, त्याबाबतची माहिती कृषी ग्राहक, सहकारी संस्था, बचत गट, गावपातळीवरील संस्था, ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटीद्वारे देण्याची सूचनाही नाळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT