132% sowing in Nagar district
132% sowing in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे आत्तापर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १३२ टक्के म्हणजे पाच लाख ९५ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच तूर, मूग, उडदाचे क्षेत्रही वाढले आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

नगर जिल्ह्यात मृग नक्षत्रापासूनच चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे उडीद, मूग, तूर, सोयाबीन, बाजरीची पेरणी तसेच कापूस लागवड झपाट्याने झाली. आर्द्रा नक्षत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे जूनमध्ये खरिपाच्या पेरणीने वेग घेतला.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार पावणे पाच लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. मात्र, यंदा चांगल्या पावसामुळे आजअखेर सरासरी ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टरच्या तुलनेत ५ लाख ९५ हजार ५९५ हेक्‍टरवर म्हणजे १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीपेक्षा यंदा दीड लाख हेक्टरच्या जवळपास जास्त पेरणी झाली आहे. भुईमूग व भात वगळता सर्वच पिकांची सरासरी पेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

तूर, मूग, उडदाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, आता सततच्या पावसाने आता पिके अडचणीत येऊ लागली असून नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. बहुतांश भागात पिकांना खत मात्रा देण्याची लगबग सुरू आहे. मात्र युरिया मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT