ऊस तोडणी
ऊस तोडणी  
मुख्य बातम्या

ऊसदरासाठी तेरा संघटना एकत्र

Raj Chougule

कोल्हापूर : यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी संघटनानी एकत्र येत 3500 रुपये पहिल्या दराची मागणी रेटली आहे. लागलीच आंदोलनाची भूमिकाही जाहीर केली आहे. मागील देणी देण्यासाठीही कारखानदारांच्यावर दबाव टाकण्याचे या संघटनांचे नियोजन आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर या संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊसदराचा लढा सुरू असतानाच आता स्वाभिमानी व रयत संघटना वगळता इतर बहुतांशी शेतकरी संघटनांनी एकत्रित येत आपली भूमिका जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून एका संघटनेतून नाराज व्हायचे आणि दुसरी संघटना काढायची अशा पद्धतीने नव्या शेतकरी संघटना उदयास येत आहेत. या संघटना स्थापन झाल्यानंतर पहिला उद्देश हा जुन्या संघटनेच्या भूमिकेवर, व्यक्तीवर टीका करणे हाच असल्याने त्यांच्या मागण्याही मग फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत.  पंधरा वर्षांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे प्राबल्य होते. यानंतर वैचारिक निर्णय न पटल्याने या संघटनेची छकले होण्यास प्रारंभ झाला. या संघटनेतून बाहेर पडलेल्या घटकांनी स्वतंत्र संघटना स्थापन केल्या. काही कालावधीनंतर त्याही एकसंघ राहू शकल्या नाहीत. नाराजांची फौज वाढत जाऊन त्याची परिणामी नव्या संघटना स्थापन करण्यावर झाली. गेल्या काही दिवसांत अनेक संघटना अगदी मोजके कार्यकर्ते घेऊन ऊसप्रश्‍नी लढत आहेत. या संघटनांचे मुद्दे चांगले असले तरी त्याचा परिणाम शासन दरबारी फारसा प्रभावी होत नसल्याने अखेर सोमवारी काही शेतकरी संघटना कोल्हापुरात एकत्र आल्या आहेत. या मध्ये रघुनाथदादांची शेतकरी संघटना, धनाजी चुडमुंगे यांची आंदोलन अंकुश, किसानपुत्र, जयशिवराय किसान मोर्चा बळिराजा, शरद जोशींची मूळ संघटना आदींसह 13 संघटना एकत्रित आल्या आहेत. केवळ उसाचा प्रश्‍न रेटणे हाच या मागचा उद्देश असल्याचे या शेतकरी संघटनेच्या सूत्रांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ऊस लढा निरपेक्ष भावनेने पुढे नेणार असल्याचे एकत्रित झालेल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT