द्राक्ष निर्यात
द्राक्ष निर्यात  
मुख्य बातम्या

सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यात

टीम अॅग्रोवन

सांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी आखाती आणि युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे १२ हजार ०४७ टन द्राक्षे निर्यात केली आहेत. मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलोस १० ते २० रुपयांनी कमी दर मिळाला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत.  सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकरी पाणीटंचाईवर मात करत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी युरोप आणि आखाती देशात प्रामुख्याने द्राक्ष पाठवितात. यंदा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ६० ते ९० रुपये असा दर मिळाला होता. द्राक्षाला मागणी देखील होती. यंदा मात्र प्रारंभी द्राक्ष निर्यातीस अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे द्राक्षाला अपेक्षित दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्षाचा दर सुरवातीपासून ५० ते ७० रुपये असा राहिला. त्यामध्ये वाढ झाली नाही. परिमाणी, गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात निर्यातक्षम द्राक्षाला १० ते २० रुपये कमी दर मिळाला. जिल्‍ह्यातून यंदा युरोपमध्ये ५७२ कंटेनर म्हणजे ६,८६४ टन, तर आखाती देशात ३९२ कंनेटर म्हणजे ५,१८२.९८६ टन एकूण १२,०४७. ९६८ जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. प्रामुख्याने तासगाव, खानापूर आणि मिरज तालुक्‍याचा पूर्व भागातील शेतकरी द्राक्ष निर्यात करताहेत. यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असलेल्या क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र शेतकऱ्यांनी अडचणींवर मात करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT