12 crore turnover from direct sale of agricultural commodities in Aurangabad district
12 crore turnover from direct sale of agricultural commodities in Aurangabad district 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात शेतमालाच्या थेट विक्रीतून १२ कोटींची उलाढाल

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  ः शहरासह ग्रामीण भागात भाजीपाला व फळे पुरवठादार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या थेट विक्रीची उलाढाल १२ कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांवर पोहोचली आहे.

लॉकडाउनमध्ये  थेट फळे, भाजीपाला विक्रीची संकल्पना पुढे आली. २९ मार्चपासून २२ ऑगस्टपर्यंत औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ५२ लाख १ हजार ४७१ किलो भाजीपाला व ६३ लाख ३१ हजार ९२ किलो फळांची थेट ग्राहकांना विक्री झाली. त्यातून तब्बल १२ कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची उलाढाल झाली. सुरुवातीला जवळपास २० शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागातून सुरू झालेला प्रवास ७७ सहभागीदारापर्यंत पोहोचला आहे. 

तालुकास्तरीय विक्रीत औरंगाबाद तालुक्यात २ लाख ५ हजार ५८० किलो भाजीपाला व २२ लाख ३३ हजार ५४० किलो फळांच्या विक्रीतून एक कोटी ३७ लाख २९ हजार ४०० रुपये, पैठण तालुक्यात २ लाख १४ हजार ९६६ किलो भाजीपाला व ३ लाख ७६४ किलो फळांच्या विक्रीतून १ कोटी ९ लाख ८० हजार ३०७ रुपये, फुलंब्रीत ३ लाख सहा हजार ८१ किलो भाजीपाला व १ लाख ५५ हजार ३०५ किलो फळे विक्रीतून ६९ लाख ६६ हजार १८२ रुपये, तर वैजापूर तालुक्यात ३ लाख ५४ हजार ३१६ किलो भाजीपाला, १ लाख ५० हजार ९१० किलो फळांच्या विक्रीतून ८९ लाख ९८ हजार १२९ रुपये उलाढाल झाली. 

गंगापूर तालुक्यात १८ लाख ७७ हजार ७४५ किलो भाजीपाला, तर १८ लाख ४० हजार ६५५ किलो फळांची विक्री झाली. त्यामधून २ कोटी ३५ लाख ५ हजार ८६० रुपये यांची उलाढाल झाली. खुलताबादमध्ये ४३ लाख ३ हजार ५७० रुपये प्राप्त झाले. सिल्लोड तालुक्यात ८२ लाख ७९ हजार २१७ रुपयांची, कन्नड तालुक्यात ८८ लाख ९५ हजार ७४० रुपयांची उलाढाल झाली. 

शेतकऱ्याने मिळविले ६ लाख रूपये

सोयगाव तालुक्यात १ लाख ४७ हजार ४६९ किलो भाजीपाला, १ लाख १६ हजार ४५९ किलो फळांच्या विक्रीतून ६२ लाख ७१ हजार ५८४ रुपयांची उलाढाल नोंदली गेली. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून विकल्या गेलेल्या २० हजार किलो फळांच्या विक्रीतून ६ लाख रुपयांचे उत्पन्न  शेतकऱ्याला मिळाले, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT