1192 workers left for Lucknow by special passenger train from Akola Station
1192 workers left for Lucknow by special passenger train from Akola Station 
मुख्य बातम्या

अकोल्यातून विशेष प्रवासी रेल्वेगाडीने ११९२ कामगार लखनौकडे रवाना 

टीम अॅग्रोवन

अकोला ः अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या श्रमिक, मजूर, नागरिकांना घेऊन अकोला ते लखनौ ही स्पेशल श्रमिक एक्सप्रेस सोमवारी (ता. ४) सायंकाळी येथील रेल्वेस्थानकावरून रवाना झाली. लॉकडाऊनमुळे इथं अडकून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना आपल्या गावी जाण्याची अपेक्षा पूर्ण झाली. 

कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन कालावधीत अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेगाडीने उत्तर प्रदेशातील लखनौ येथे रवाना करण्यात आले. या ट्रेनमध्ये ११९२ प्रवासी होते. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अनिल बागले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. 

अडकलेल्या या प्रवाशांच्या जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मार्गदर्शन केले होते. २४ कोच असलेल्या या विशेष रेल्वे गाडीत उत्तर प्रदेशात जाणारे अकोला जिल्ह्यातील २२२, अमरावती जिल्ह्यातून ५६६, यवतमाळ जिल्ह्यातून २४६, वाशीम जिल्ह्यातून १४८ असे ११९२ मजूर रवाना झाले. या सर्व जिल्ह्यांतून विशेष बस गाड्यांद्वारे या प्रवाशांना अकोला रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. आल्यावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जातांना प्रत्येकाला फुड पॅकेट, पाण्याची बाटली देण्यात आली. सायंकाळी सहा वाजता अकोला रेल्वेस्टेशन वरून ही गाडी रवाना झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT