rain
rain  
मुख्य बातम्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार कोटी 

टीम अॅग्रोवन

मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपये तरतुदीस मान्यता दिली आहे. मंगळवारी (ता. ३) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता दिली.यातून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपद्‌ग्रस्त नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 

या निधीपैकी मदतीसाठी १५०० कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी ३००० कोटी व बाधित क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७००० कोटी खर्चास देण्यास मान्यता देण्यात आली. 

सानुग्रह अनुदान ः कुटुंबांना कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तू यांचे नुकसानीकरिता ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडले असण्याची अट शिथिल करून ५ हजार रुपये प्रतिकुटुंब, कपड्यांचे नुकसानीकरिता आणि ५ हजार रुपये प्रतिकुटुंब, घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसानीकरिता देण्यात येईल. 

पशुधन नुकसानीसाठी मदत  दुधाळ जनावरांसाठी ४० हजार प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे ः ३० हजार प्रति जनावर, ओढकाम करणारी लहान जनावरे २० हजार प्रति जनावर, मेंढी/बकरी/डुक्कर ४ हजार रुपये (कमाल ३ दुधाळ जनावरे किंवा कमाल ३ ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल ६ लहान ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल ३० लहान दुधाळ जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत). कुक्कुटपालन पक्षी ५० रुपये प्रति पक्षी, अधिकतम ५००० रुपये प्रति कुटुंब. 

घरांच्या पडझडीसाठी मदत  पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी १ लाख ५० हजार रुपये प्रति घर. अंशतः पडझड झालेल्या (किमान ५०%) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत ५० हजार. अंशत: पडझड झालेल्या (किमान २५%) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत २५ हजार. अंशत: पडझड झालेल्या (किमान १५%) कच्च्या/पक्क्या घरांसाठी १५ हजार रुपये. नष्ट झालेल्या झोपड्या १५ हजार रुपये. (शहरी भागात मात्र ही मदत घोषित केलेल्या झोपडपट्टी पट्ट्यातील पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांसाठी देय राहील. ग्रामीण भागात अतिक्रमित झोपडी जे नियमितीकरणास पात्र आहेत. पण अद्याप नियमितीकरण झालेली नाहीत ती पात्र राहतील.) 

मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अर्थसाह्य  अंशत: बोटीचे नुकसान १० हजार रुपये, बोटींचे पूर्णत: नुकसान २५ हजार रुपये, जाळ्यांचे अंशत: नुकसान ५ हजार, जाळ्यांचे पूर्णत: नुकसान ५ हजार रुपये. 

हस्तकला/कारागिरांना अर्थसाह्य  जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. हस्तकला व हातमाग कारागीर यामध्ये बारा बलुतेदार, मूर्तिकार इत्यादी यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. 

दुकानदारांना अर्थसाह्य  जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त .५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 

टपरीधारकांना अर्थसाह्य जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत, अशा टपरीधारकांपैकी अधिकृत टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 

कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपये इतकी मदत देण्यास मान्यता देण्यात आली.  पुराच्या वारंवारितेचा अभ्यास करून अहवाल द्या ः मुख्यमंत्री  पुराची वारंवारिता वाढत आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांची समिती स्थापन करून त्याचा अभ्यास करण्यात यावा. तसेच या अभ्यासामध्ये राष्ट्रीय जल विकास अभिकरण या संस्थेचा सहभाग घेण्यात यावा. या अभ्यासाचा अहवाल मंत्रिमंडळास सादर करण्यात यावा. महाड आणि चिपळूण या क्षेत्रातील गंधारी, सावित्री, वशिष्टी या नद्यांच्या खोलीकरणाचे व नदी पात्रात सुधारणा करण्याचे व पूर संरक्षक भिंती बांधण्याबाबत सखोल अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने पुढील तीन वर्षांत याबाबत कार्यक्रम राबविण्यात यावा. एककालिक आधारसामग्री अधिग्रहण प्रणाली पुढील तीन महिन्यांत उभी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT