सरपंचासह ११ सदस्य अपात्र
सरपंचासह ११ सदस्य अपात्र 
मुख्य बातम्या

सरपंचासह ११ सदस्य अपात्र

टीम अॅग्रोवन

नाशिक  : बागलाण तालुक्यातील सोमपूर ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारात सरपंचासह ११ सदस्य अपात्र ठरले आहेत. या सर्वांनी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध ग्रामविकासमंत्र्यांकडे अपील केले होते, पण अपील फेटाळल्यामुळे हे सदस्य अपात्र ठरले आहेत. याबाबत नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

 सोमपूर ग्रामपंचायतीमध्ये २०१६ मध्ये ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत प्राथमिक चौकशीनंतर विभागीय चौकशीची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊन अहवाल सादर केला होता.

ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीचा खर्च कसा करावा, याबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदींतील कलमांचे उल्लंघन करण्याबरोबरच ग्रामपंचायतीने कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्टपणे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे  विभागीय आयुक्तांनी सदस्यांना अपात्र ठरविले होते. याविरुद्ध सरपंच व सदस्यांनी ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. ग्रामसेवक यापूर्वीच निलंबित याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी होऊन त्यात दोषी ठरविण्यात आलेले सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी उपोषण केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT