cotton procurement
cotton procurement 
मुख्य बातम्या

सीसीआयला केंद्राकडून १०५९ कोटींचा मदतनिधी 

Chandrakant Jadhav

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर कापसाची देशभरातील विविध केंद्रांच्या माध्यमातून विक्रमी खरेदी केली आहे. परंतु जागतिक बाजारातील विविध संकटे व ठप्प झालेली उचल यामुळे सीसीआयला वित्तीय फटका बसला असून, यातून सावरण्यासाठी केंद्राने नुकताच सीसीआयला १०५९ कोटी रुपये मदतनिधी मंजूर केला आहे. 

२०११-१२ नंतर सीसीआयने देशात कापसाची विक्रमी खरेदी केली आहे. यंदा बाजारात हमीभावापेक्षा म्हणजेच ५४५० व ५३५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी दर आहेत. दर कमी राहील्याने सीसीआयच्या केंद्रांमध्ये कापसाची आवक अधिकच राहीली. राज्यात विदर्भ, मराठवाडा क्षेत्रात सुमारे ६७ खरेदी केंद्र सीसीसीआयने सुरू केले होते. तसेच पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथेही कापूस खरेदी केली. यंदा फेब्रवारीअखेरपर्यंत सुमारे ९२ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची खरेदी सीसीआयने देशभरात केली. तर मागील हंगामातील ११ लाख गाठी सीसीआयकडे शिल्लक आहेत. अर्थातच सुमारे १०३ लाख गाठी सीसीआयकडे असून, त्या गोदामांमध्ये आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना विषाणू व इतर संकटांमध्ये मंदी आली. त्यात गाठींची विक्री परवडत नसल्याने सीसीआयने आपला साठा राखून ठेवला. त्यात सीसीआयचे नुकसानही झाले आहे. हे नुकसान भरून निघावे व खरेदीला प्रोत्साहन यासाठी केंद्राने सीसीआयला अनेक वर्षानंतर प्रथमच १०५९ कोटी मदतनिधी मंजूर केला आहे. सीसीआयकडे केंद्रधारक कारखानदार व शेतकरी यांचे चुकारे थकीत नाहीत. जो निधी थकीत आहे, तो बॅंक पासबूक, आधार क्रमांक आदी तांत्रिक अडचणींमुळे थकल्याची माहिती सूत्रांनी दिली.  पुन्हा खरेदी शक्‍य  सीसीआयची खरेदी राज्यात मराठवाडा व इतर भागात २९ फेब्रुवारीनंतर बंद आहे. काही केंद्र प्रशासन व कारखानदार यांच्या समन्वयाने २, ३ मार्चपर्यंत सुरू होते. तेदेखील नंतर बंद झाले. आता कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर ही खरेदी सुरू होवू शकते, अशी माहिती मिळाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT