संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरणार

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा बॅंक योजनेतून घेतलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे संपूर्ण व्याज शासनामार्फत भरण्याची नवी योजना (व्याज परतावा) शासन राबविणार आहे. या योजनेची सुरवात येत्या २६ जानेवारीला करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.

मुद्रा बॅंक जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हा प्रशासन, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित मुद्रा बॅंक मेळाव्यात ते बोलत होते. श्री पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तरुण-तरुणींनी व्यवसाय, उद्योगासाठी मुद्रा बॅंक योजनेतून घेतलेल्या १० लाखांपर्यंच्या कर्जाचे संपूर्ण व्याज शासनामार्फत व्याज परतावा योजनेतून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

मात्र यासाठी ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. या योजनेतून १० हजार तरुणांना एक हजार कोटीच्या कर्जाचे होणारे ६ लाखांचे व्याज शासनामार्फत व्याज परतावा योजनेतून लाभार्थींच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास निश्चितपणे मदत होईल. या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT