नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात १० टक्के घट
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात १० टक्के घट 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात १० टक्के घट

टीम अॅग्रोवन

नाशिक : सप्टेंबरअखेर नाशिक जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपलब्ध पाणीसाठा ७८ टक्के नोंदवला गेला आहे. मान्सूनचा हंगाम संपला असून, या पाणीसाठ्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नसून, आहे त्या पाण्यावरच भागवावे लागणार असल्याची स्थिती आहे.

गंगापूर, दारणा आणि गिरणा धरण समूहांमध्ये एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. गतवर्षी या धरणांमध्ये आजमितीस ५८ हजार २४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, यंदा केवळ ५१ हजार १०८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार १३७ दशलक्ष घनफूट पाणी कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. गतवर्षी ८८ टक्क्यांवर असलेला सरासरी पाणीसाठा यंदा ७८ टक्क्यांवर आला आहे.

गिरणात ४८ टक्केच पाणी गिरणा धरण यंदा निम्मेही भरलेले नाही. त्याची पाणी साठवण क्षमता १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. गतवर्षी धरणात १२ हजार १०७ दलघफू म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ८ हजार ८६० दलघफू म्हणजेच ४८ टक्के आहे.

धरणांतील पाणीसाठा (टक्के)

धरण      वर्ष २०१७ २०१८
गंगापूर         १००   ९१
काश्यपी  १००    ९९
गौतमी गोदावरी १०० १००
आळंदी १०० १००
पालखेड ९९   ५२
करंजवण      १००  ९४
वाघाड १००  १००
ओझरखेड १००   ९०
पुणेगाव    ९९     ९२
तिसगाव १०० ९६
दारणा १०० ९३
भावली   १०० १००
मुकणे    ८७ ७४
वालदेवी १०० १००
कडवा १००   ८५
नांदूरमध्यमेश्वर १००    ५९
भोजापूर ९५ ७६
चणकापूर १०० ९७
हरणबारी   १०० १००
केळझर   १००   ९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT