bardana
bardana  
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गनगरी : भात खरेदीसाठी १ लाख बारदानाची मागणी

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ३७ भातखरेदी केंद्रांवर आतापर्यंत १० हजार क्विंटल खरेदी करण्यात आले असून, अजूनही मोठ्या प्रमाणात भात खरेदी शिल्लक आहे. त्यासाठी १ लाख बारदानाची गरज असल्याची मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. 

किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात भात खरेदी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या ४९ पैकी ३७ केंद्रांवर भात खरेदी सुरू झाली आहे. जिल्हा व तालुका खरेदी- विक्री संघामार्फत भाताची खरेदी सुरू आहे. भात खरेदी केंद्रावर ५९ हजार ५०० नवीन बारदाना, तर दुबार वापरलेली ३९ हजार ९७५ अशी एकूण ९९ हजार ४७५ बारदानाचे वाटप केले आहे. आतापर्यंत १० हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आला. अजून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात भातखरेदी होणार आहे. त्यासाठी १ लाख बारदानाची गरज भासणार आहे. हे बारदाना मार्केटिंग फेडरेशनला वेळेत मिळावे, या मागणीचे निवेदन सावंत यांनी सहकारमंत्री पाटील यांची भेट घेऊन दिले.  सहकारमंत्र्यांची सूचना  सहकारमंत्री पाटील यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला मार्केटिंग फेडरेशनला बारदाना पुरविण्याची सूचना केली. एका गावात १० टनांपेक्षा जास्त भात उपलब्ध असेल, तर कंपनी थेट गावात जाऊन खरेदी करील. एक शेतकरी आपल्या सातबारावर पाच टनांपर्यंत भात विक्री करू शकतो, असेही चर्चेवेळी मंत्री पाटील यांनी स्पष्ट केल्याचे सावंत यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT