1 crore 86 lakh farmers accident insurance sanctioned in Kolhapur district
1 crore 86 lakh farmers accident insurance sanctioned in Kolhapur district 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे १ कोटी ८६ लाख मंजूर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : शेतामध्ये काम करीत असताना किंवा इतर कारणास्तव अपघात झाल्यास शासनाकडून शेतकरी कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात जिल्ह्यातील ११५ दाव्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या ९३ शेतकऱ्यांच्या वारसांना निधी मंजूर झाला आहे.  प्रत्येकी २ लाख याप्रमाणे १ कोटी ८६ लाख मंजूर झाले आहेत. कृषी आयुक्तालय स्तरावरून जिल्हा कार्यालयास निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा स्तरावरून त्याचे वितरण संबंधित ९३ शेतकऱ्यांच्या वारसाच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २२ दावे प्रलंबित असून शासन स्तरावरून त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे.  २०२१-२२ मध्ये सदर योजना ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ चा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी अत्यल्प राहिला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे वारसदार यांनी विहित नमुन्यातील विमा दावेप्रस्ताव सादर करावेत.  अधिक माहितीसाठी कृषी विभागातील, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, ग्राम पातळीवरील कृषी पर्यवेक्षक तथा सदरकर्ता अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT