1 crore 84 lakh fruit crop insurance sanctioned in Parbhani
1 crore 84 lakh fruit crop insurance sanctioned in Parbhani 
मुख्य बातम्या

परभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा मंजूर

टीम अॅग्रोवन

परभणी ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मधील अंबिया बहारातील संत्रा, केळी, आंबा या फळविकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ७५ हजार ८६९ रुपये विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षी जिल्ह्यातील ३७ कर्जदार आणि १ हजार २८७ बिगर कर्जदार असे एकूण १ हजार ३२४ शेतकऱ्यांनी ४५ लाख ४८ हजार ४३४ विमा हप्तात भरुन १ हजार ८८.७९ हेक्टरवरील फळपिकांसाठी ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या हिश्शाचा प्रत्येकी २ कोटी ३१ लाख ३१ हजार ८६ रुपये तसेच शेतकऱ्यांचा ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपये मिळून एकूण ५ कोटी ८ लाख १० हजार ६०६ रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला होता.

जिल्ह्यातील ११८ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार २३० रुपये विमा हप्ता भरून १०६.५५ हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. आंबा उत्पादक ३७ शेतकऱ्यांनी १ लाख ७४ हजार ८४५ रुपये विमा हप्ता भरून २८.९० हेक्टरवरील आंबा पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. मोसंबी उत्पादक १५८ शेतकऱ्यांनी ५ लाख २० हजार ७१३ रुपये विमा हप्ता भरून १३५.२५ हेक्टरवरील मोसंबी पीकविमा संरक्षित केले होते. संत्रा उत्पादक १ हजार ११ शेतकऱ्यांनी ३१ लाख ४९ हजार ६४७ रुपये विमा हप्ता भरून ८१८.०९ हेक्टरवरील संत्रा पिकांना विमा कवच घेतले होते.

संत्रा, केळी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाला आहे. संत्रा पिकांच्या नुकसानी बद्दल बोरी, जिंतूर, मानवत, जांब, कात्नेश्वर या पाच मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १९ हजार २५० रुपये तर पूर्णा या मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३८ हजार ५०० रुपये दराने विमापरतावा मंजूर झाला आहे.

ऊती संवर्धित केळी पिकांच्या नुकसानी बद्दल पेडगाव, जांब (ता. परभणी), बोरी, सांवगी म्हाळसा (ता. जिंतूर), कुपटा (ता.सेलू), केकरजवळा (ता. मानवत), बाभळगाव (ता. पाथरी)आवलगाव (ता. सोनपेठ), महातपुरी (ता. गंगाखेड) नऊ मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३३ हजार रुपये दराने तर सिंगणापूर (ता. परभणी) आणि मानवत या दोन मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४१ हजार रुपये दराने विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.

आंबा फळ पिकांच्या नुकसानीबद्दल जांब (ता. परभणी) आणि मानवत मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६ हजार ५० रुपये दराने तर पिंगळी (ता. परभणी), चुडावा (ता. पूर्णा) या दोन मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३० हजार २५० रुपये दराने पीकविमा परतावा मंजूर झाला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT