1 crore 7 lakh loan disbursement on agricultural mortgage in Parbhani district
1 crore 7 lakh loan disbursement on agricultural mortgage in Parbhani district 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात शेतीमाल तारणावर १ कोटी सात लाखांचे कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत यंदा बुधवार (ता. २४) अखेर ९४ शेतकऱ्यांना ३ हजार ५०६ क्विंटल शेतीमालावर १ कोटी ६ लाख ९८ हजार ८१० रुपये कर्ज वितरित करण्यात आले’’, अशी माहिती पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे यांनी दिली.

शेतीमालाचे बाजार भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत शेतीमाल तारण कर्ज घेऊन तातडीच्या गरजा भागविता येतात. तेजी आल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने राज्य पणन महामंडळांतर्गत शेतीमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. या अंतर्गत शेतीमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने दिले जाते. परभणी बाजार समिती स्वनिधीतून ही योजना राबवीत आहे. जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी येथील बाजार समित्या पणन मंडळाच्या अर्थसहाय्याने ही योजना राबवीत आहेत.

यंदा या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ११३ प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी ९४ शेतकऱ्यांना तारण कर्ज वितरित करण्यात आले. एकूण ३ हजार ५०६ क्विंटल तारण शेतीमालाची किंमत १ कोटी ३९ लाख ९८ हजार ७८८ रुपये आहे. त्यात परभणी बाजार समितीने २१ शेतकऱ्यांना ८२१.५८ क्विंटल सोयाबीनवर २९ लाख ५५ हजार १५३ रुपये, ३ शेतकऱ्यांना ७२.२ क्विंटल हरभऱ्यावर २ लाख ५१ हजार ९५१ रुपये कर्ज दिले. 

जिंतूर बाजार समितीने १०६.९० क्विंटल सोयाबीनवर ३ लाख १६ हजार ६९० रुपये, सेलू बाजार समितीने ४ शेतकऱ्यांना २३१ क्विंटल सोयाबीनवर ७ लाख २० हजार ८०० रुपये कर्ज दिले. मानवत बाजार समितीने १४ शेतकऱ्यांना ६०२ क्विंटल सोयाबीनवर १७ लाख ७८ हजार २०० रुपये, ३ शेतकऱ्यांना ४५ क्विंटल हरभऱ्यावर १ लाख ६८ हजार ७५० रुपये, १ शेतकऱ्यास २१ क्विंटल हळदीवर १ लाख ४ हजार रुपये आणि १ शेतकऱ्यास ९.६० क्विंटल गव्हावर १२ हजार २४० रुपये कर्ज दिले. पाथरी बाजार समितीने ४३ शेतकऱ्यांना सोयाबीनवर ४३ लाख ९१ हजार रुपये कर्ज दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT