औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत जूनअखेर क्षमतेच्या केवळ ०.४७ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. लांबलेल्या आणि असमान बरसणाऱ्या पावसाने अजून प्रकल्पांची तहान भागविण्याचे काम सुरू केले नसल्याची स्थिती आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ०.२१ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ०.८१ टक्के, ७४९ लघू प्रकल्पांत १.१६ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ०.०३ टक्के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांत उपयुक्त पाणी शिल्लक नसल्याची स्थिती आहे. ११ मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ निम्न मनार प्रकल्पात ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
इतर सर्व दहा मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणी नाही. हीच स्थिती लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७ व परभणीमधील २ मध्यम प्रकल्पांची आहे. नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ३ टक्के, तर बीडमधील १६ व जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांत २ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
२०१७ मध्ये मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत २८ जूनअखेर १९ टक्के, तर २०१८ जूनअखेर १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत २८ जून २०१७ अखेर १२ टक्के, २०१८ मध्ये ९ टक्के शिल्लक असलेला उपयुक्त पाणीसाठा यंदा २८ जुअखेर १ टक्क्यांवर आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत केवळ १ टक्का, बीडमधील १२६ प्रकल्पांत १ टक्का, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत १ टक्का, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ४ टक्के, हिंगोलीतील २६ प्रकल्पांत १ टक्का उपयुक्त पाणी आहे. परभणीमधील २२, जालन्यातील ५७ व लातूरमधील १३२ लघू प्रकल्पांत उपयुक्त पाणी नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.