संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातबारा, गाव नकाशा जोडल्याने जागा खरेदीतील फसवणूक टळणार

टीम अॅग्रोवन

सातारा  : जागा खरेदी करताय, ती कुठे आहे, तिच्या चतुःसीमा काय आहेत, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहेत, दाखवली तीच जागा प्रत्यक्षात खरेदीखत करून ताब्यात मिळणार आहे का, असे अनेक प्रश्‍न तुमच्या मनात उभे राहतात. त्यांची १०० टक्के उत्तरे मिळतील असे नाही. परिणामी, अनेकदा जागा दाखवली एक आणि खरेदी केल्यानंतर ती असते भलतीकडे. मग फसवणूक झाल्याचे लक्षात येते. आता अशी फसवणूक टळणार आहे. कारण, भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशे एकमेकांशी ‘लिंक’ केले आहेत. 

आता जमिनीची खरेदी आणि दस्तनोंदणी करण्यापूर्वी सर्व माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. यापूर्वी गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत होती. सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्‍यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांश-रेखांशासह (जीपीएस) सर्व माहिती सहज उपलब्ध होणे शक्‍य झाले आहे. एवढेच नाही, तर ज्या सर्व्हेनंबर अथवा गटनंबरमधील जमीन तुम्ही खरेदी करीत आहात, त्या सर्व्हेनंबरचे एकूण क्षेत्र, त्यात असलेले पोटहिस्से, त्यांचे मालक यांचीदेखील माहिती मिळणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिल्याने त्यांची निःशुल्क प्रिंट काढून दस्त खरेदीला देखील जोडता येईल. राज्यातील एकूण ४४ हजार गावांपैकी ३७ हजार गावांतील गाव नकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक करण्यात आले आहेत. भूमी अभिलेख विभागाच्या https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT