ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार 
मुख्य बातम्या

मध्य प्रदेशमधील प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकत नाही : शरद पवार

टीम अॅग्रोवन

मुंबई  : शंभर दिवसांच्या महाराष्ट्र सरकारला शंभर मार्क असे सांगतानाच मध्य प्रदेशात जो प्रयोग झाला तो महाराष्ट्रात कदापि होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ठाकरे सरकार उत्तम कामगिरी करत असून इथे भाजप नेत्यांना कोणतीही संधी नाही. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी श्री. पवार बुधवारी (ता. ११) मुंबईत आले होते. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना श्री. पवार म्हणाले, की राज्य सरकारने शंभर दिवस पूर्ण केले आहेत. हे सरकार योग्य दिशेने योग्य पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेईल. मध्य प्रदेशाच्या स्थितीसंदर्भात श्री. पवार म्हणाले, की ज्योतिरादित्य शिंदे हे एक चांगले युवा नेतृत्व होते. पण त्यांच्या पक्षात काय झाले हे मला माहिती नाही. पण काँग्रेस पक्षात निवडणूक हरलेल्या नेत्यास लगेच काही जबाबदारी दिली जाईल असे होत नसते. तरीही आता असे वाटते की कदाचित शिंदे यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले असते, तर कदाचित स्थिती निराळी झाली असती. पण मुख्यमंत्री कमलनाथ यांना मी ओळखतो. राजकीय चमत्कार करण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे. 

काँग्रेसने चौथ्या जागेवर दावा केल्याने केवळ शरद पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आला. फौजिया खान यांचा अर्ज वेटिंगवर ठेवण्यात आला. त्याबाबत श्री. पवार म्हणाले, की लवकरच राज्यसभेच्या चौथ्या जागेसंदर्भात निर्णय होईल. एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT