आषाढी एकादशीसाठी सजविलेल्या एसटी बसमधून संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका मंगळवारी (ता.३०) देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.
आषाढी एकादशीसाठी सजविलेल्या एसटी बसमधून संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका मंगळवारी (ता.३०) देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. 
मुख्य बातम्या

संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

टीम अॅग्रोवन

देहू, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकाराम आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे मंगळवारी (ता. ३०) दुपारी एक वाजता मार्गस्थ झाल्या. फुलांनी सजविलेल्या एसटी बसमध्ये यंदा तुकोबांच्या पादुका संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सेवेकरी अशा वीस जणांबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. 

‘कोरोना’मुळे शासनाने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. त्यामुळे १२ जूनला प्रस्थान झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देऊळवाड्यातच मुक्कामी होत्या. आज (बुधवारी) आषाढी एकादशी असल्याने शासनाने वीस जणांच्या उपस्थितीत संस्थानला पंढरपूरकडे जाण्यास परवानगी दिली. मुख्य देऊळवाड्यात मंगळवारी पहाटे काकडा झाला. संत श्री तुकाराम शिळा मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने आरती झाली. भजनी मंडपात संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. त्यानंतर देहूकरांचे कीर्तन झाले. त्यानंतर संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर इनामदारवाड्याजवळ एसटी बसमध्ये पादुका ठेवण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT