संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात बॅंकांच्या चौकशीसाठी पथक नियुक्त

टीम अॅग्रोवन

अकोला : कर्जमाफी योजनेत बँकांनी व्याजदर जास्त लावणे; तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न करणे या बाबींची चौकशी करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी तक्रारींची दखल घेत बँकांच्या चौकशीबाबत आदेश दिल्याने अकोला जिल्हा प्रशासनाने तातडीने पथकाची नियुक्ती केली. चार सदस्यांचे हे पथक बॅंकांची चौकशी करणार आहे.

कर्जमाफी प्रक्रियेत शासनाचा निधी वाचावा म्हणून शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना बँकांनी सहकारी कायदा आणि रिझर्व्ह बँकेचे नियम पाळले नाहीत. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या; तसेच कर्जमाफीत कर्ज फिटल्यानंतरदेखील नवीन पीककर्ज बँकांनी दिले नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी तातडीने चार सदस्यांचे पथक नियुक्त केले. या पथकाने आठ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पथकाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.   

पथकातील सदस्य  पथकात सहायक निबंधक एस. पी. पोहरे, अप्पर विशेष लेखा परीक्षक आर. एम. जोशी, विशेष लेखा परीक्षक एस. एस. देशपांडे, लेखा परीक्षक के. आर. तायडे यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT