कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकाऱ्याचा दर्जा देण्याची मागणी
कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकाऱ्याचा दर्जा देण्याची मागणी 
मुख्य बातम्या

कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकाऱ्याचा दर्जा देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन

पुणे  ः राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे तांत्रिक अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष नितीन धामणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व रोजगार हमी मंत्र्यांना पाठविले असल्याची माहिती भोर तालुका ग्रामसेवक संघटनेचे भूषण पुरोहित यांनी दिली.

सध्या राज्यातील स्थिती कोविड कोरोनामुळे भीषण होत आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा या रोगाचे परिणाम दिसत आहेत. याचा सर्वात जास्त फटका शेतकरी व मजूर वर्गाला बसत आहे. अशातच मोलमजुरी करणाऱ्या लोकांना रोजगार हमी योजनेच्या कामांवर जावे लागत आहे; परंतु या कामांवर जाण्यासाठी जॉब कार्ड, मागणी अर्ज अनिवार्य आहे. सद्यःस्थितीत राज्यातील सर्व ग्रामसेवक ही कामे करत आहेत. मात्र ग्रामसेवकांना यात तांत्रिक अधिकार नसल्याने त्यांना तांत्रिक अधिकाऱ्यांवर विसंबून राहावे लागत आहे.

परिणामी तांत्रिक अधिकाऱ्याला अनेक विभागातील कामे करावी लागत असल्याने संबंधित मजुराला यामुळे कामाचा मोबदला मिळण्यास उशीर होतो. याशिवाय राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांकडे तांत्रिक पदवी असताना त्यांना कामाचे मोजमाप, मूल्यांकन करण्याचा अधिकार द्यावा, असे या निवेदनात नमूद केले आहे.  

कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकाऱ्याचा दर्जा दिल्यास होणारे फायदे

  • कामांचे मोजमाप, मूल्यांकन वेळेत होईल. 
  •  शासनाची आर्थिक बचतही होईल.
  • बोगस कामांना आळा बसेल
  • कंत्राटीकरणावरील शासनाचा खर्च कमी होईल.
  •  नियोजित काम वेळेत केल्यास याचा फायदा मजुरांना होईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

    Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

    Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

    Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

    Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

    SCROLL FOR NEXT