संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील वृक्षलागवडीचा घेतला जाणार आढावा

टीम अॅग्रोवन

नगर ः वनविभागाने विविध यंत्रणांच्या माध्यमातून वृक्षलागवड केली. आता लागवड करण्यात आलेली किती रोपे जिवंत आहेत याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी शासनासने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून ही समिती शासनाला अहवाल देणार आहे. राज्यात यंदा ३४ कोटी ५४ लाख, ६० हजार १९९ वृक्ष लागवड झाली आहे. 

दुष्काळी भागात पावसाचे प्रमाण वाढावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभागासह जिल्हा परिषद, कृषी, सामाजिक वनीकरण व अन्य संस्था, शाळा, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचीही मदत घेण्यात आली. जिल्ह्यात यंदा १ कोटी १८ लाख ८० हजार ७१० लाख वृक्ष लागवड केली आहे. राज्यात यंदा जवळपास ३३ कोटी वृक्ष लागवड झाली आहे. आता या लागवड केलेल्या रोपांपैकी किती रोपे जिवंत आहेत याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीची शुक्रवारी नगरला बैठक झाली. जिल्हा परिषद, कृषी, समाजीक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

विविध यंत्रणांनी लावलेल्या रोपांची सद्य:स्थिती तपासली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांच्या महिन्यातून किमान २ रोपवनांची तपासणी करणे, दरमहा जिवंत रोपांच्या टक्केवारीचा आढावा घेणे, जिवंत रोपे ८० टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आदींचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाणार आहे. 

ज्या यंत्रणांनी वृक्षलागवड केली आहे, त्यांनी त्या रोपांना जगवण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करावी. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वृक्षलागवडीनंतर किती रोपे जगली याची तपासणी सुरू होईल, तसेच रोपवाढीसाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याची गरज असेल तर तसे करावे लागेल. राज्यात या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड झाली होती. आता त्यातील जिवंत रोपे आणि समाधानकारक वाढ तपासली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.    अधिकाऱ्यांचा होणार गौरव  शासनाच्यावतीने वर्षापासून राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभागासह जिल्हा परिषद, कृषी, सामाजिक वनीकरण व अन्य संस्था, शाळा, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मदतीने लावलेल्या रोपांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक जिवंत रोपे आणि समाधानकारक वाढ असल्याचे दिसल्यास ज्या यंत्रणेने ही रोपे लावली त्या आणि संबंधित विभागातील समन्वय अधिकाऱ्यांचा गौरव होणार आहे. राज्यात यंदा ३४ कोटी ५४ लाख, ६० हजार १९९ वृक्ष लागवड झाली असून त्यासाठी ९५ लाख १९ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT