पंढरपुरात श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात ३१०० रत्नागिरी हापूस आंब्यांनी व आंब्याच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली.
पंढरपुरात श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात ३१०० रत्नागिरी हापूस आंब्यांनी व आंब्याच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली. 
मुख्य बातम्या

श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास हापूस आंब्यांची आरास

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः पंढरपुरात श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात ३१०० रत्नागिरी हापूस आंब्यांनी व आंब्याच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली. त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरूप प्राप्त झाले.

वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आंब्याची ही नेत्रदीपक आरास करण्यात आली आहे. रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या ३१०० हापूस आंब्यांनी ही आरास केली आहे. श्री विठ्ठलाचा गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्यांची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून, देवाचे हे लोभस रुप रविवारी अधिकच खुलून दिसत होते. श्री विठ्ठला प्रमाणे श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातही आंब्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.

‘कोरोना’चे जगावर ओढावलेले संकट दूर करण्याची भावना ठेवून विठ्ठलभक्त हरीश बैजल (अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर सेल) अजय सालुखे (उद्योगपती, पुणे), उमेशभाई भुवा (सांगली), दिपकभाई शहा (सांगली), सुनील उंबरे (पंढरपूर) या भक्तांनी आंब्यांची ही पूजा अर्पण केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT