कीडनाशकयुक्त आहाराचीही मधमाश्‍यांना लागते चटक
कीडनाशकयुक्त आहाराचीही मधमाश्‍यांना लागते चटक 
मुख्य बातम्या

कीडनाशकयुक्त आहाराचीही मधमाश्‍यांना लागते चटक

वृत्तसेवा

कीडनाशकयुक्त आहार खाण्यात असलेल्या बंबल बी माश्यांच्या वर्तनात बदल होत जातो. विशेषतः अशा आहाराविषयी व्यसन लागल्यासारखी स्थिती इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडन आणि क्विन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील अभ्यासात आढळली आहे. कीडनाशकयुक्त आहार वसाहतीमध्ये येत राहिल्यास वसाहतीच्या प्रजोत्पादनांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘प्रोसिंडिग्स ऑफ दी रॉयल सोसायटी बी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. निओनिकोटीनॉईड वर्गातील कीटकनाशकांवर युरोपिय महासंघात जवळपास संपूर्ण बंदी घातली असली तरी जगभरामध्ये त्यांचा वापर अद्यापही सुरू आहे. या कीटकनाशकांचा मधमाश्यांवर होणाऱ्या परिणामांवर सातत्याने बोलले जाते. मधमाश्‍यांच्या शरीरक्रियांवर होणाऱ्या परिणामांविषयी अभ्यासही होतो. मात्र नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये वर्तनामध्येही बदल होत असल्याचे दिसून आले. संशोधक डॉ. रिचर्ड गील यांनी सांगितले, की सुरवातीला पर्याय दिला असता मधमाश्‍या शक्यतो निओनिकोटीनॉईडची प्रक्रिया केलेल्या आहाराला टाळत असल्याचे आढळले. मात्र, जेव्हा एखादी मधमाशी अशा आहाराच्या संपर्कात येते, तेव्हा त्याविषयी आकर्षण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. माणसांमध्ये निकोटीनच्या वापरामुळे जी स्थिती निर्माण होते, तशीच स्थिती कीटकांमध्ये निओनिकोटीनॉईडमुळे ग्रहण पेशींवर दिसून येते.

  • या अभ्यासात संशोधकांनी बंबल बीच्या दहा वसाहतींचे दहा दिवस निरीक्षण केले. प्रत्येक वसाहतीला त्यांचे खाद्य गोळा करण्याचे क्षेत्र ठरवू दिले. त्यात निओनिकोटीनॉईड असलेले आणि नसलेले असे दोन्ही पर्याय होते.
  • सुरवातीला कीडनाशक नसलेल्या आहाराला प्राधान्य दिले. काही काळानंतर त्यांच्या आहारात कीडनाशकयुक्त घटकांचा समावेश झाल्यानंतर त्याकडे आकर्षण वाढले. पुढील टप्प्यामध्ये कीडनाशक नसलेल्या आहाराकडे त्यांच्या फेऱ्या कमी झाल्याचे दिसले.
  • यामागील सर्व यंत्रणाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकताही संशोधकांनी व्यक्त केली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT