Milk prebiotics are the cat's meow
Milk prebiotics are the cat's meow 
मुख्य बातम्या

पाळीव प्राण्यांसाठी मातेच्या दुधाप्रमाणे प्रीबायोटिक्सची निर्मिती

टीम अॅग्रोवन

नवजात बालकांच्या पूरक आहारामध्ये मातेच्या दुधातील ऑलिगोसॅकराईड घटक कमी असण्याची बाब अत्यंत महत्त्वाची आहे. माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांच्या नवजात पिल्लांच्या वाढीमध्ये पूरक आहाराची निर्मिती करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. पाळीव प्राण्यांतील कुत्रा आणि मांजर यांच्या पिल्लांसाठी ऑलिगोसॅकराईड घटक असलेली पूर्व उपयुक्त जैविक घटक (प्री बायोटिक्स) तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांच्या पचनसंस्थेमध्ये उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी आईच्या दुधाच्या समकक्ष घटकांची निर्मिती व वापर करण्याचा प्रयत्न बहुतांश पशूखाद्य निर्माते करत असतात. त्यासाठी सामान्यतः गुंतागुंतीच्या कर्बोदकांचा वापर सामान्यतः केला जातो. हे घटक लहान मुलांच्या पचनसंस्थेतील आरोग्यदायी जिवाणूंच्या वाढीमध्ये पूर्व उपयुक्त जैविक घटकांप्रमाणे (प्री बायोटिक्स) काम करू शकतात. ऑलिगोसॅकराईड घटकांची निर्मिती ही काही मानवी मातेचीच मक्तेदारी आहे असे नाही, तर बहुतांश सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधामध्ये ते आढळतात. इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी, ग्राहक आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये झालेल्या नव्या संशोधनाप्रमाणे दूधातील ऑलिगोसॅकराईड घटक पशू आहारामध्ये मिसळले असता मांजर आणि कुत्र्यांसाठीही तितकेच फायद्याचे आढळले आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल प्लॉसवन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मानवी पोषकता विषयाचे प्रो. केली स्वानसन यांनी सांगितले, की वास्तविक कुत्र्याच्या आहारामध्ये ऑलिगोसॅकराईड घटकांच्या मिश्रणाबाबत केवळ एकच अभ्यास झालेला होता. स्थानिक मांजराबाबत एकही अभ्यास झालेला नव्हता. त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या या दोन प्राण्याच्या पिल्लांच्या वाढीसाठी पोषक घटकांची पूर्तता योग्य प्रकारे करण्याच्या उद्देशाने अधिक अभ्यास करण्यात आला. त्या पोषकतेसोबत प्रतिकारकता वाढवणे आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्या पचनसंस्थेमध्ये आरोग्यपूर्ण सूक्ष्मजीवांच्या समुदायांची वाढ करणे हेही उद्देश होते. १) कुत्र्याच्या दुधामध्ये ३' सियालिलॅक्टोज, ६' सियालिलॅक्टोज आणि २' फुकोसिलॅक्टोज (३'sialyllactose, ६'-sialyllactose, आणि २'fucosyllactose) हे तीन ऑलिगोसॅकराईड घटक आढळतात. त्याचे प्रमाण एकूण ऑलिगोसॅकराईड घटकांच्या ९० टक्क्यांपर्यंत होते. सध्या तयार केल्या जात असलेल्या लहान पिल्लांच्या खाद्यामध्ये अशाच प्रकारची संयुगेही आढळतात. २) मांजराचे दूध हे अधिक गुंतागुंतीचे आणि संतुलित असते. त्यामध्ये अंदाजे १५ संरचनांपासून ९० टक्क्यांपर्यंतची ऑलिगोसॅकराईड घटक तयार होतात. त्यातही प्रत्येकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या घटकांमध्ये difucosyllactose-N-hexaose b, ३'-sialyllactose, आणि lacto-N-neohexaose हे तीन घटक आढळतात. ३) सामान्यतः कुत्रा किंवा मांजर हे दोन्ही प्राणी मूलतः मांसाहारी म्हणून उत्क्रांत होत गेले असले तरी त्यांच्या चयापचयाच्या पद्धती अनेक प्रकाराने वेगळ्या आहेत. पाळीव मांजर हे पूर्णपणे (खऱ्या अर्थाने) मांसाहारावर राहू शकते. पाळीव कुत्रे मात्र निसर्गतः सर्वभक्षी असल्याचे स्वानसन सांगतात. जन्मानंतर मांजर किंवा कुत्र्यांच्या पिल्लांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या मातेकडून मिळणाऱ्या दूधामध्ये असलेल्या ऑलिगोसॅकराईड घटकांमध्येही लक्षणीय भिन्नता आढळते. प्रत्यक्ष उत्पादनाची निर्मिती व चाचण्या ः स्वानसन आणि सहकाऱ्यांनी प्रथम मांजर आणि कुत्र्यांच्या दुधातील ऑलिगोसॅकराईड घटक वेगळे ओळखले. पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा उद्योग प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा वेळी पिल्लांच्या वाढीसाठी पोषक आहाराची उपलब्धता करणे गरजेचे होत आहे. २०१९ मध्ये स्वीडिश जैवतंत्रज्ञान विषयक कंपनी ग्न्युबायोटिक्स सायन्स यांनी प्राणीज दुधाप्रमाणे ऑलिगोसॅकराईडयुक्त उत्पादन जीएनयू १०० तयार केले. मात्र, त्याच्या शास्त्रीय चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यावर स्वानसन यांनी कुत्रे व मांजर या पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षितता, पचनीयता या अंगाने अभ्यास केला आहेत. त्याविषयी दोन निष्कर्ष जर्नल ऑफ अॅनिमल सायन्स या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

  •  संशोधकांनी जीएनयू१०० मध्ये एक टक्के मेद घटक मिसळले. व्यावसायिक कोरड्या प्राणीज खाद्याप्रमाणे कुत्रा आणि मांजरांना देण्यात आले. त्याच वेळी नियंत्रित गटांमध्ये जीएनयू १०० नसलेले खाद्यही देण्यात आले. जेव्हा प्राण्यांना दोन्हीपैकी निवड करण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी प्राणी या नव्या खाद्यासाठी वेड्याप्रमाणे धावले.
  •  त्यातही मांजरांनी नव्या खाद्याला अधिक प्राधान्य दिले. मांजरे अन्य खाद्याच्या तुलनेमध्ये १८ टक्के अधिक नवा आहार खात असल्याचे दिसून आले.
  •  अधिक प्रयोगामध्ये प्रौढ कुत्रे व मांजरांच्या सामान्य आहारामध्ये जीएनयू१०० चे प्रमाण ०%, ०.५%, १%, आणि १.५% असे सहा महिन्यासाठी ठेवण्यात आले. या दरम्यान या प्राण्यांच्या वाढीच्या सर्व घटकांचे मापन करण्यात आले. त्यांच्या आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम आढळले नाहीत. त्यांच्या पचनसंस्थेतील आरोग्यपूर्ण सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT