ज्वारी पिकाची विविधता जपण्याची आवश्यकता
ज्वारी पिकाची विविधता जपण्याची आवश्यकता 
मुख्य बातम्या

ज्वारी पिकाची विविधता जपण्याची आवश्यकता

वृत्तसेवा

कृषी पद्धतीतील बदलामुळे गेल्या सहा हजार वर्षांमध्ये ज्वारीसारख्या तृणधान्यांची विविधता कमी होत गेली आहे. अशा धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या मद्यार्कांचेही प्रमाणही कमी झाले आहे. या पिकांची विविधता जपण्यासाठी त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्यकता वारविक विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्या ज्वारी हे पीक प्रामुख्याने खाद्यपीक आणि चारापीक म्हणून शिल्लक राहिले आहे. पूर्वी दुरंगी ज्वारींचा वापर मद्यार्कांच्या निर्मितीसाठी होत असे. या पिकाचे स्थानिकीकरण होताना व्यवस्थापन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, त्यामुळे पिकांचे अवमूल्यन होत आहे. ज्वारीच्या जंगली पूर्वजांच्या जनुकांमध्ये फारसे बदल झालेले दिसत नाहीत. मात्र, लागवडीखालील ज्वारीमध्ये जनुकीय पातळीवर बदल दिसून येत आहेत. सध्या जरी जंगली ज्वारीचे उत्पादन आपण घेत नसलो तरी या प्रजाती जपण्याची आवश्यकता विरविक विद्यापीठातील प्रो. रॉबीन ॲलाबी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यामध्ये भविष्यामध्ये तापमानवाढीच्या काळात या प्रजाती मोलाच्या ठरू शकतात. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष नेचर प्लॅंट्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अनेकार्थांने महत्त्वाची ज्वारी... ज्वारी हे पीक जागतिक पातळीवर तृणधान्यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. हे कोरडवाहू क्षेत्रातील कमी पाण्यावर येणारे महत्त्वाचे पीक असून, त्याचा उपयोग मानवी आहारातील धान्यांसह, कडबा (चारा) यासाठी होतो. ईशान्य आफ्रिकेतील काही देशांची अर्थव्यवस्था ज्वारी पिकांवर आणि प्रामुख्याने त्यापासून उत्पादित होणाऱ्या चारा आणि बिअरवर अवलंबून आहे. जंगली ज्वारी प्रजाती जपून ठेवल्यास भविष्यामध्ये ज्वारी पिकामध्ये होणाऱ्या जनुकीय दुरुस्तींसाठी फायद्याचे ठरू शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT