परिपूर्ण मत्स्याहाराने दम्याशी लढणे शक्य
परिपूर्ण मत्स्याहाराने दम्याशी लढणे शक्य 
मुख्य बातम्या

परिपूर्ण मत्स्याहाराने दम्याशी लढणे शक्य

वृत्तसेवा

सॅलमोन, ट्रॉट आणि सार्डिन्स या सारख्या माशांचा आहारामध्ये समावेश असल्यास मुलांमधील दम्याचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे वैद्यकीय चाचण्यामध्ये आढळले आहे. या चाचण्या ग्रीस येथील ला ट्रोब विद्यापीठामध्ये घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय अभ्यासामध्ये दमा असलेल्या मुलांना मध्यपूर्वेतील आहार विशेषतः माशांतील मेदाम्लांचे अधिक प्रमाण दिल्यास सहा महिन्यांनंतर त्यांच्या फुप्फुसाच्या क्षमतेमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. ला ट्रोब विद्यापीठातील संशोधिका मारिया पापामिकाईल यांनी सांगितले, की वाढीच्या वयामध्ये मुलांना आरोग्यपूर्ण आहार दिल्यास बाल दम्यावर उपयुक्त ठरू शकते. आहारामध्ये मेद, साखर आणि मिठाचे प्रमाण अधिक असल्यास मुलांमधील दम्याचा विकास आणि वाढीवर त्याचा परिणाम होतो, हे आपल्याला माहीत होते. आता आहारामधील बदलाद्वारे दम्याच्या लक्षणांचे नियंत्रण करणे शक्य असल्याचे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत.

  • मेदयुक्त माशांमध्ये ओमेगा ३ मेदाम्लांचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. या अभ्यासामध्ये आठवड्यातून केवळ दोनवेळा मासे खाण्यात असलेल्या मुलांमधील दम्यात होणारा फुप्फुसाचा दाह लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
  • पारंपरिक मध्यपूर्वेतील आहारामध्ये वनस्पतीजन्य घटक आणि मेदयुक्त माशांचे प्रमाण अधिक असते. या आहारपद्धतीचा उपयोग बालदमा असलेल्या मुलांसाठी सोपा, सुरक्षित आणि कार्यक्षम ठरू शकतो, असे प्रो. इत्सीपोलास यांनी सांगितले.
  • असे झाले प्रयोग या प्रयोगामध्ये अथेन्स (ग्रीस) येथील ६४ मुलांवर चाचण्या करण्यात आल्या. ही मुले ५ ते १२ वयोगटातील व कमी प्रमाणात दमा असणारी होती. ऑस्ट्रेलिया आणि ग्रीस येथील संशोधकांनी त्यांची विभागणी दोन गटामध्ये केली. एका गटाला आठवड्यातून दोन वेळा शिजवलेल्या माशांचा आहार ( किमान १५० ग्रॅम) सहा महिन्यांसाठी देण्यात आला. उर्वरित गटाला सामान्य आहार दिला होता. चाचणीनंतर ज्यांच्या आहारामध्ये माशांचा समावेश होता, त्यांच्या ब्रोन्चिअल दाहाचे प्रमाणे १४ युनिटने कमी झाल्याचे दिसून आले. हे संशोधन `जर्नल ऑफ ह्युमन न्युट्रीशन अॅँड डायटेटीक्स`मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

    Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

    Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

    Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

    Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

    SCROLL FOR NEXT