इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीज
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीज 
मुख्य बातम्या

इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीज

वृत्तसेवा

चीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते. चीजची चव वाढण्यासाठी मुद्दाम त्याचे एजिंग केले जाते. मात्र, इजिप्शियन थडग्यामध्ये नुकतेच आजवरचे सर्वात जुने घन स्वरूपातील चीज सापडले आहे. त्याविषयीची माहिती ‘एसीएस’च्या ‘जर्नल अॅनालिटकल केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ख्रिस्तपूर्व १३ व्या शतकामध्ये इजिप्त येथील मेम्फिस शहराचे मेयर असलेल्या पीताहमेस यांचे थडगे १८८५ मध्ये प्रथम आढळले होते. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या वाळूच्या वादळामुळे पुन्हा ते झाकले गेले. त्याचा पुनर्शोध २०१० मध्ये पुन्हा घेण्यात आला. या वेळी उत्खनन तज्ज्ञांना काही तुटलेली भांडी सापडली. अशाच एका भांड्यामध्ये पांढरा घट्ट काही पदार्थ होता, त्याला कापडाच्या साह्याने बांधले होते. त्याचे विश्लेषण एन्रिको ग्रेको आणि सहकाऱ्यांनी आधुनिक पद्धतीने केले. त्यातील पदार्थ दुधापासून बनलेला असून, त्यावरील कपड्याचे आवरण पातळ पदार्थापेक्षाही घट्ट पदार्थासाठी योग्य असल्याचे आढळले. नमुन्यातील अन्य काही पेप्टाईडमध्ये ब्रुसेल्ला मेलिटेनिस या जिवाणू आढळले. या जिवाणूमुळे प्राणी आणि माणसांसाठी ब्रुकेल्लोसीस या प्राणघातक रोगाचा प्रादुर्भाव होतो. निर्जंतुक नसलेल्या डेअरी उत्पादने खाण्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्राथमिक निष्कर्षांना अधिक बळकटी आणण्यासाठी अधिक संशोधन केले जात आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT