राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा प्रत्येक कण वेगळा करण्याच्या उद्देशाने चुंबकीय अब्जांशी कण (नॅनो पार्टिकल्स) विकसित केले आहेत. हे संशोधन ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ च्या ‘जर्नल एनव्हायर्नमेंटल सायन्स ः वॉटर रिसर्च अॅंड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. वास्तविक पाण्यामध्ये तेल हे कधीच मिसळत नाहीत. मात्र, विहिरीमध्ये असे तेल सातत्याने घुसळले जात असल्यास ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थिर (इमल्सिफाइड) होते. ते वेगळे करणे अडचणीचे व सध्याच्या विविध पद्धतीद्वारेही जवळपास अशक्य मानले जाते. होस्टन येथील राईस विद्यापीठातील रसायन अभियंत्या सिबानी लिसा बिस्वाल यांनी तेलाला खेचून घेणारे नॅनो कण तयार केले आहे. त्यांच्या वापरामुळे असे इमल्सिफाइड तेल पाण्यातून सुमारे ९९ टक्क्यांपर्यंत दूर करणे शक्य होते. सध्या प्रोडक्शन फ्लो या पद्धतीने हे पाणी वेगळ्या टाकीमध्ये घेऊन, त्यात काही रसायने आणि सरफॅक्टंट मिसळले जातात. त्याद्वारे पाण्याच्या पृष्ठभागावरील, विहिरीच्या कड्या कोपऱ्यातून तेल दाबाने खेचून घेतले जाते. मात्र, या पद्धतीमध्ये तरिही पाच टक्क्यांपर्यंत तेल पाण्यामध्ये राहते. ते ९९ टक्क्यांपर्यंत दूर करण्यासाठी बिस्वाल व त्यांच्या गटाने संशोधन केले आहे. असे आहे तंत्र
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.