फळांच्या रंगामागील कारणांचा घेतला जातोय शोध
फळांच्या रंगामागील कारणांचा घेतला जातोय शोध 
मुख्य बातम्या

फळांच्या रंगामागील कारणांचा घेतला जातोय शोध

वृत्तसेवा

फळांना आकर्षक रंग का मिळतो, हा संशोधकांना कायम पडलेला प्रश्न. त्याची विविध कारणे दिली जातात. त्यातील नेमक्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न ड्यूक विद्यापीठातील संशोधक करत आहे. त्याचे निष्कर्ष सायन्टिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. लालचुटूक स्ट्रॉबेरी, हिरवे कलिंगड, पिवळजर्द संत्रे आपल्याला आकर्षित करतात. त्याचप्रमाणे विविध प्राण्यांनाही आकर्षित करत असतात. यामागे बियांचा व प्रजातींचा विविध ठिकाणी प्रसार होण्यासाठी हे आवश्यक असल्याचे संशोधकांचे मत आहे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धांपासून संशोधक रंगबिरंगी फळे, चवदार गर यांच्या उत्क्रांतीमागील कारणांचा शोध घेत आहेत. त्याचे विविध सिद्धांत मांडले जात असले तरी प्रमुख प्राण्यांना आकर्षित करणे हाच होता. कारण प्राण्यांद्वारे फळे खाल्ली जाऊन, त्याच्या बिया दूरपर्यंत विखुरल्या जातात. यातील एक त्रुटी म्हणजे माणसाला त्यांच्या डोळ्याच्या विशिष्ठ रचनेमुळे जे व जसे रंग दिसतात, तसे ते प्राण्यांच्या त्यांच्या डोळ्यांच्या विशिष्ट रचनेमुळे दिसत असतीलच असे नाही. म्हणजे आपल्याला जो रंग लाल दिसतो, तो बैलाला काळा दिसत असतो, तर लेमुर माकडाला वेगळाच दिसत असणार. डोळ्याची रचना

  • माणसांच्या डोळ्यामध्ये तीन प्रकारच्या रंगांचे ग्रहण करणाऱ्या पेशी (सेन्सिंग कोनसेल्स) आहेत. प्रत्येक पेशी प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबीचे ग्रहण करतात. मात्र अनेक सस्तन प्राण्यांमध्ये केवळ दोन प्रकारच्या रंगाचे ग्रहण करणाऱ्या पेशी आहेत.
  • पक्ष्यांमध्ये चार प्रकारच्या कोनसेल्स असतात. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या रंगाचे प्रकाश त्यांना दिसतात.
  • जे फळ आपल्याला काळ्या रंगाचे दिसते, त्यावरून परावर्तित होणारी अतिनिल किरणांमुळे पक्ष्यांना वेगळ्याच रंगाचे दिसते.
  • असे आहेत संशोधनाचे निष्कर्ष

  • जर्मनी येथील उल्म (जर्मनी) येथील ओमेर नेव्हो विद्यापीठातील वॅलेना आणि सहकाऱ्यांनी युगांडा आणि मादागास्कर येथील ९७ वनस्पती प्रजातींच्या पिकलेल्या फळे आणि पानांवरून परावर्तित होणाऱ्या रंगांची माहिती गोळा केली आहे. फळांचे रंग हे प्रजातीशी जोडलेला असल्याचे लक्षात आले.
  • जी फळे प्राधान्याने माकडे आणि एप्स खातात, त्यावर हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित होतो.
  • जी फळे पक्ष्यांकडून खाल्ली जातात, त्यातून लाल रंगाचा प्रकाश परावर्तित होतो. हिरव्या रंगाच्या पानामध्ये दडलेली फळे लाल रंगाची असल्यास पक्ष्यांना त्वरीत लक्षात येत असावीत. पक्षी हे खाद्याच्या निवडीसाठी रंगाच्या माहितीवर अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक विसंबून असल्याचे दिसून येते.
  • ज्या वनस्पतींची फळे अतिनिल प्रकाश परावर्तित करतात, त्यांच्या पानातूनही असाच प्रकाश परावर्तित होत असल्याचे आढळले. याचा अर्थ पुन्हा पर्यावरणातील घटकांशी -सूर्यप्रकाशाशी जोडला जातो. यामुळे कडक सूर्यप्रकाशांमध्ये फळांचे किंवा पानांचे नुकसान होत नाही.
  • पुढील टप्प्यामध्ये फळांचा गंध, आकार आणि पोत यांचे विश्लेषण करण्याचा विचार असल्याचे नेवो यांनी सांगितले.
  • उष्णकटिबंधीय वनस्पतींच्या उत्क्रांतीमध्ये कोणत्या प्राण्याकडून प्रसार व्हावा, या अनुषंगाने फळांचा रंग विकसित झाला असावा, या तत्त्वाला या संशोधनातून दुजोरा मिळाला आहे.
  • मानवाशिवाय काही माकडे आणि प्रगत सस्तन प्राणी सोडले तर अन्य प्राण्यांना आपल्याप्रमाणे रंग दिसत नाहीत. उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये वनस्पतींनी आपल्या फळांना एखादा रंग निवडण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. कारण आपल्या अन्य प्रजातीपेक्षा फळांचा रंग भिन्न असल्याने अनेक गोष्टी बदलल्या जातात. अन्य कारणांमध्ये हवामानातील घटक जसे उंची, तापमान, मातीचे गुणधर्म यांचाही समावेश असू शकतो. -प्रो. किम वॅलेन्टा, उत्क्रांती मानववंशशास्त्राचे सहायक संशोधक , ड्यूक विद्यापीठ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

    Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    SCROLL FOR NEXT