पूरस्थितीशी जुळवून घेऊ शकेल भातपीक
पूरस्थितीशी जुळवून घेऊ शकेल भातपीक 
मुख्य बातम्या

पूरस्थितीशी जुळवून घेऊ शकेल भातपीक

वृत्तसेवा

पूरस्थितीमध्ये भातपिकाची उभी उंची वाढवणाऱ्या जनुकाचा शोध जपानमधील तोहोकू विद्यापीठ, नागोया विद्यापीठ आणि अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या घेतला आहे. यामुळे पूरस्थितीमध्ये तग धरणाऱ्या जातींचा विकास सुलभ होणार आहे. हे संशोधन जर्नल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. पिकाच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असली, तरी अधिक काळ पाणी साचून राहिल्यास मुळे कुजून रोपे मरण्याची भीती असते. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये दर काही वर्षाने येणाऱ्या पुरामुळे शेते काही महिन्यांसाठी अगदी काही मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली असतात. अशा स्थितीमध्ये तग धरणाऱ्या भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या असून, त्यांना ‘डीपवॉटर राईस’ या नावाने ओळखले जाते. या जाती जरी उथळ पाण्यामध्ये वाढत असल्या तरी पूरस्थितीमध्ये काही काळ तग धरू शकतात. तोहोकू विद्यापीठातील ताकेशी कुरोहा, नागोया विद्यापीठातील मोतोयुकू अशिकारी आणि कॉर्नेल विद्यापीठातील सुझॅन मॅककाऊच या संशोधकांनी आपल्या सहकाऱ्यांसह पूरस्थितीमध्ये तग धरण्यासाठी कारणीभूत भातातील जनुकांचा शोध घेतला. त्याच प्रमाणे भाताच्या मूलद्रव्यीय कार्यप्रमाणी आणि उत्क्रांतीतील बदल यावरही संशोधन केले. त्यातून त्यांनी खोल पाण्यात तग धरण्यासाठी कार्यरत भातातील जनुक एसडी१ (SEMIDWARF१) ओळखले आहे. हे जनुक वनस्पतीतील वाढीसाठी कारणीभूत संप्रेरक जीब्रेलीन निर्मितीसाठी कार्यरत विकराला चालना देते. जेव्हा भात पाण्यामध्ये बुडते, त्या वेळी भातामध्ये इथिलीन वायू जमा होतो. या नव्या जातीमध्ये एसडी१ जनुक इथिलीन निर्मितीच्या प्रक्रियेला (OsEIL१a या घटकाला) चालना देते. त्याच प्रमाणे जीब्रेलिन्सचे (जीए४) प्रमाण वेगाने वाढून पिकाची उभी वाढ वेगाने होते.

  • हे गुणधर्म बांगलादेशातील जंगली भातजातीमध्ये प्रथम आढळले होते. त्यात सुधारणा करण्यात आली.
  • एसडी १ हे जनुक हरितक्रांतीपासून सर्वाना ज्ञात असून, प्रामुख्याने त्याचा विचार हा बुटक्या भातजातीसाठी करण्यात आला. त्यातून रोग प्रतिकारकता आणि अधिक उत्पादकता आणणे शक्य झाले.
  • संशोधक कुरोहा म्हणाले, की भविष्यामध्ये हवामान बदलामुळे तीव्र वातावणामध्ये भर पडत जाणार असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. पीकपद्धतीमध्ये बदलासोबतच नव्या जनुकीय गुणधर्मयुक्त जातींचा स्वीकार करणे आवश्यक राहणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT