वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई इंधनाची निर्मिती
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई इंधनाची निर्मिती 
मुख्य बातम्या

वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई इंधनाची निर्मिती

वृत्तसेवा

पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून उत्तम दर्जाचे उच्च घनतेचे हवाई इंधन तयार करण्यात चीन येथील संशोधकांना यश आले आहे. या वनस्पतीजन्य इंधनामध्ये पर्यावरणात विमाने आणि रॉकेट यांच्या उड्डाणामुळे होणारे कार्बन डाय ऑक्साईडचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ ज्यूल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जैवइंधनाचा मुख्य घटक सेल्युलोज असतो. तो स्वस्त, पुनर्वापरयोग्य असून, वनस्पती पेशीच्या भित्तिकांमध्ये असतो. त्यातील जेट इंधनामध्ये वापरली जाणारी अल्केन्स (उदा. ऑक्टेन, डोडेकेन आणि हेक्साडिकेन) वेगळी करण्यात यापूर्वीच यश आले आहे. मात्र, त्याहीपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या पॉलिसायक्लोअल्केन संयुगांच्या निर्मिती शक्य होऊ शकते, असा विश्वास संशोधकांना आहे. ही संयुगे हवाई इंधनामध्ये वापरली जातात. त्याविषयी माहिती देताना संशोधन निंग ली यांनी सांगितले, की कर्बवायूंच्या उत्सर्जनाच्या समस्येवर मात करण्यामध्ये जैवइंधन मोलाचे ठरणार आहेत. पारंपरिक हवाई इंधनाच्या तुलनेमध्ये बायोमासपासून मिळवलेले इंधन हे अधिक घनतेचे असणार आहे. त्यामुळे इंधनाचे आकारमान सारखेच राहिले तरी वजनामध्ये वाढ होऊ शकते. - या इंधनाच्या निर्मितीसाठी संशोधकांनी सेल्युलोजचे निवडकपणे हेक्सानेडिओनमध्ये रुपांतर केले. त्यानंतर संयुगे वेगळी करण्याची पद्धत अवलंबली. - जैवइंधनाची खरी जादू हे त्याच्या उच्च घनतेमध्ये असून, त्यामुळे इंधनाची कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे विमाने अधिक अंतर कापू शकतील आणि अधिक वजनही नेऊ शकतील. पर्यायाने फेऱ्यांची संख्या कमी होऊन, कर्ब उत्सर्जनामध्ये घट होईल. विशेषतः उड्डाणावेळी आणि जमिनीवर येताना त्याचा फायदा होईल.

  • सध्या केवळ प्रयोगशाळेमध्ये चाचणीदरम्यान इंधन तयार केले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया अत्यंत स्वस्त राहू शकेल, अशा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला. पारंपरिक हवाई इंधनाच्या निर्मिती आणि वापरापेक्षा यातील खर्च कमी असेल. पर्यायाने अधिक नफा मिळाल्याने व्यावसायिक वापरासाठी अडचणी येणार नाहीत.
  • सेल्युलोजचे २, ५ हेक्सानेडियॉन मध्ये विघटन करण्याच्या प्रक्रियेमध्ये डाक्लोकोमिथेनचा वापर होतो. हा घटक रंग काढण्यातील द्रावणात वापरला जात असून, तो पर्यावरण आणि आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. फक्त या अडचणीवर मात करावी लागेल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT