हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटका
हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटका 
मुख्य बातम्या

हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटका

वृत्तसेवा

युरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती देशांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण ३८ टक्के असून, सुमारे ९८ टक्के कृषी उत्पादने ही आयात केली जात असल्याची बाब वॉटर फूटप्रिंट नेटवर्क संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. बदलत्या हवामानामुळे वाढत असलेल्या अवर्षणाच्या स्थितीचा फटका युरोपातील अनेक देशांना जाणवणार आहे. सध्या होत असलेली कृषी उत्पादनाची आयात ही तुलनेने दुष्काळाचा कमी किंवा मध्यम धोका असलेल्या देशातून होत आहे. मात्र, भविष्यामध्ये तीव्र हवामानाच्या स्थितीचा फटका युरोप खंडातील देशांना बसल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. इर्तुग इर्सिन यांनी सांगितले, की युरोपीय संघ हा पाण्यासाठी अन्य देशांवर अवलंबून असून, विविध कृषी उत्पादनाची आयात करावी लागते. मात्र, या समस्येकडे तितक्याशा गांभीर्याने अद्याप पाहिले जात नाही. भविष्यामध्ये जागतिक तापमानातील बदलामुळे कृषी उत्पादनाचा तुटवडा पडू शकतो. त्यासाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे महत्त्व अधिक डॉ. इर्सिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मतानुसार, युरोपीय संघाद्वारे विविध कृषी उत्पादनांचा विचार केला असता वार्षिक सुमारे ६६८ घन कि.मी. पाण्याचा वापर होतो. त्यातील तिसरा हिस्सा हा आयातीतून भागवला जातो. आयात होत असलेल्या प्रदेशातील पाण्याची कमतरता विचारात घेण्याची आवश्यकता आहे.

  • ९१ टक्के बदाम, ८७ टक्के पिस्ता, ७४ टक्के द्राक्षे, ७० टक्के भात, ५७ टक्के सोयाबीन आणि ५६ टक्के ऊस यांची आयात ही अत्यंत संवेदनशील विभागातून होते.
  • युरोपीय देशामध्ये होणारी आयात ही भारत आणि पाकिस्तान या विशेषत्त्वाने पाण्याची कमतरता असलेल्या देशातून होते. (उदा. ऊस आणि भात.)
  • पशुखाद्य पीक असलेल्या सोयाबीनवरील अवलंबित्वामुळे भविष्यात मांस आणि डेअरी उद्योगाला मोठ्या झळा बसणार आहेत.
  • अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया येथील पावसाचा पॅटर्न बदलण्याच्या स्थितीमध्ये कोकोआ, कॉफी आणि पाम तेल उद्योगांनाही फटका बसू शकतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT