गायींच्या गर्भातील मूलपेशी अलग करण्यात यश
गायींच्या गर्भातील मूलपेशी अलग करण्यात यश  
मुख्य बातम्या

गायींच्या गर्भातील मूलपेशी अलग करण्यात यश

वृत्तसेवा

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया - डेव्हिस येथील संशोधकांनी गायींच्या गर्भातील मूलपेशी वेगळ्या करण्याची अत्यंत कार्यक्षम पद्धत विकसित केली आहे. गायीसारख्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या गर्भातील मूलपेशीचा उपयोग जनुकीय तपासण्या, जनुकीय अभियांत्रिकी आणि रोगांच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो. हे संशोधन ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गर्भातील मूलपेशींना योग्य वातावरण मिळाल्यास त्यांची वाढ होऊ शकतो. त्यातून कोणत्याही आकाराचे स्नायू तयार करणे शक्य होते. याचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक फायदे असल्याने गायींच्या गर्भातील मूलपेशी अलग करण्यासाठी ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून संशोधक प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत कॅलिफोर्निया- डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांनी एक विशिष्ट कल्चर यंत्रणा तयार केली आहे. या कल्चर यंत्रणेमुळे एकाच प्रयत्नामध्ये मूलपेशी कार्यक्षमपणे वेगळ्या करणे शक्य होते. गायींतील मूलपेशी वेगळ्या करण्यामध्ये यश आले आहे. याचा फायदा मानवी मूलपेशींच्या संशोधनासाठीही मोठ्या प्रमाणात होणार आहे.

गायींच्या उत्तम व वेगवान पैदाशीसाठी प्रयोगशाळेमध्ये मुलपेशींच्या साह्याने विशिष्ठ गुणधर्मांची अंडी किंवा वीर्य तयार करणे शक्य होईल. यामुळे नव्या जातींच्या पैदाशीसाठीचा वेळ कमी होणार आहे. त्याविषयी माहिती देताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. पाब्लो रॉस यांनी सांगितले, की जनुकीय तंत्रज्ञानांचा वेग यामुळे वाढणार आहे. ज्या पैदास प्रक्रियेसाठी याआधी दशकांचा काळ लागत असे, ती केवळ दोन ते तीन वर्षांवर पोचेल. यातून अधिक उत्पादनक्षम, मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या आणि उष्ण वातावरणामध्ये चांगल्या रीतीने जुळवून घेणाऱ्या जाती तयार करता येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT