मुख्य बातम्या

इरविंग पक्ष्यांच्या पंखांची ओरिगामी, ४ डी तंत्राद्वारे नक्कल

वृत्तसेवा

कागदांच्या घडीकामाच्या कलेला `ओरिगामी` म्हणतात. ही जपानी कला केवळ मुलांच्या मनोरंजनासाठीच नव्हे; तर विविध आधुनिक उत्पादनांमध्येही मोलाची भर घालत आहे. एटीएच झुरीच आणि पुरदेई विद्यापीठातील संशोधकांनी चार मितीय (४ डी) प्रिटिंग तंत्रज्ञानामध्ये विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी ओरीगामी संरचना आणि इरविंग पक्ष्यांच्या पंखाच्या रचनेची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.

निसर्गामध्ये इरविंग पक्ष्यांचे आकाशात उडताना पसरलेल्या स्थितीमध्ये मोठे होणारे पंख पक्षी बसल्यानंतर मात्र अत्यंत कमी जागेमध्ये सामावले जातात. त्यांच्या पंखातील पडणाऱ्या घड्यांचा अभ्यास करून, ओरिगामी कलेच्या मदतीने प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहेत. सामान्य स्थितीच्या तुलनेमध्ये इरविंग पक्ष्याचे पंख उघडलेल्या स्थितीमध्ये दहा पट मोठे होतात. हे गुणोत्तर निसर्गामध्येही सर्वांत मोठे आहे. त्याचप्रमाणे एकदा उघडल्यानंतर तसेच राहण्यासाठी किंवा बंद होण्यासाठी कोणत्याही स्नायूंच्या उर्जेची आवश्यकता राहत नाही, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. एखादी मोठी संरचना गुंडाळून कमीत कमी जागेमध्ये ठेवण्यासाठी अशाप्रकारे ओरिगामी कला उपयुक्त ठरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT