निळ्या रंगाकडे मधमाश्या होतात आकर्षित
निळ्या रंगाकडे मधमाश्या होतात आकर्षित 
मुख्य बातम्या

निळ्या रंगाकडे मधमाश्या होतात आकर्षित

वृत्तसेवा

अमेरिकेतील ओरेगॉन राज्य विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात निळ्या चमकदार रंगातील विशिष्ठ तरंगलांबीचा प्रकाश मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना आपल्या पिकांकडे फुलोऱ्यांच्या एक ते दोन आठवड्यांच्या विशिष्ठ कालावधीमध्ये मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी होऊ शकेल. परागीकरणासाठी मधमाश्या अत्यंत महत्त्वाच्या असून, अमेरिकी अर्थव्यवस्थेतील सुमारे १०० व्यावसायिक पिकांमध्ये त्यांची कमतरता भासत आहे. याचा सुमारे १५ अब्ज डॉलरइतका फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मधमाश्यांना पिकांकडे आकर्षित करण्यासाठी योग्य तरंगलांबीचा प्रकाश शोधण्यासाठी भौतिकशास्त्र विषयातील संशोधिका ओक्साना ओस्ट्रोव्हेरखोवा यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, निळ्या रंगाचा चमकदार प्रकाशाकडे मधमाश्या आकर्षित होतात. थोडक्यात, या रंगाच्या प्रकाशाला त्या टाळूच शकत नाहीत. केवळ दृष्टीला दिसणाऱ्या रंगापेक्षाही त्यांच्या वर्तनातील कोणतीतरी बाब त्यांना तिकडे खेचत असल्याचे स्पष्ट जाणवते. माणसांच्या नजरेपेक्षा भिन्नता ः

  • मधमाश्यांमध्ये माणसांप्रमाणेच ट्रायक्रोमॅटिक म्हणजेच तीन प्रकारचे फोटो रिसेप्टर असलेली दृष्टी असते. माणूस आणि मधमाश्या दोघांमध्ये निळ्या आणि हिरव्या रंगाचे रिसेप्टर सारखे असतात. मात्र, तिसरा रिसेप्टर माणसांमध्ये लाल रंगाचा, तर मधमाश्यांमध्ये अतिनील किरणांचा असतो. खरेतर ही किरण इलेक्टोमॅग्नेटिक ऊर्जेची कमी तरंगलांबीची असून, ती माणसांच्या नजरेच्या कक्षेबाहेर असतात.
  • फुलांचे चमकदार रंग आणि पॅटर्न त्यांना केवळ अनिनील किरणांच्या नजरेद्वारे दिसतात. मधमाश्या गोळा करत असलेल्या फुलातीस मधूरसातून ऊर्जा, तर परागांमधून प्रथिने मिळवतात. या प्रक्रियेमध्ये पुंकेसरावरील पराग हे स्त्री केसरावर पडतात.
  • असे आहेत संशोधनाचे निष्कर्ष ः नैसर्गिक प्रकाशामध्ये निळ्या रंगाची तरंगलांबी मोठी आहे. सूर्यप्रकाशातील हिरव्या रंगाच्या शेवटापासून जांभळ्या रंगापर्यंतचा भाग परावर्तित करणाऱ्या सापळ्याकडे मधमाश्या आकर्षित होतात. ओस्ट्रोव्हेरखोवा यांनी केलेल्या प्रयोगामध्ये मिळालेल्या निष्कर्षानुसार खास निळ्या चमकदार रंगाचे (तरंगलांबी ४२० ते ४८० नॅनोमीटर) आणि हिरव्या रंगाचे (तरंगलांबी ५१० ते ५४० नॅनोमीटर) प्रक्षेपण करणारे सापळे तयार केले. त्यातील निळ्या रंगाच्या तुलनेमध्ये हिरव्या रंगाच्या सापळ्याकडे मधमाश्या कमी आकर्षित होत असल्याचे आढळले. निळ्या रंगामध्ये ४०० ते ४२० नॅनोमीटर तरंगलांबीपेक्षा ४३० ते ४८० नॅनोमीटर या टप्प्यातील चमकदार प्रकाश आकर्षित करत असल्याचे दिसून आले. हे संशोधन जर्नल ऑफ कंपॅरिटिव्ह फिजिऑलॉजी या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT