काललातील जिवाणूंचा प्रादुर्भाव
काललातील जिवाणूंचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

कालवातील हानिकारक जिवाणूंचा प्रादुर्भाव बेतू शकतो जिवावर

वृत्तसेवा

कालव किंवा कवचधारी अपृष्ठवंशीय प्रजातींचा आहारामध्ये वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिकेमध्ये या प्रजातींच्या विक्रीने ३२९ दशलक्ष डॉलरचा टप्पा गाठला आहे. मात्र, ते कच्च्या किंवा अर्ध कच्च्या स्वरूपामध्ये खाण्यात आल्यास त्यातील जिवाणूंमुळे माणसांच्या जिवावरही बेतू शकते. यासाठी कारणीभूत व्हिब्रियो प्रजातींच्या विविध जिवाणूंना रोखण्यासाठी अमेरिकी कृषी संशोधन सेवेमध्ये जैविक पद्धतीवर संशोधन करण्यात येत आहे. त्यामुळे शेलफिश उद्योगामधील नुकसान कमी करणे शक्य होणार आहे.

चविष्ठ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असलेले अपृष्ठवंशीय कवचधारी प्राणी सागर तळाशी वाळूमध्ये वाढतात. त्यातील शेलफिश हे ब्रॅकीश आणि खाऱ्या पाण्याच्या पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. पर्यटनालाही कालव आधारीत पदार्थांमुळे चालना मिळत आहे. मात्र, हे पदार्थ तयार करताना अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतात. कारण कच्च्या किंवा अर्ध कच्च्या स्वरूपामध्ये शेलफिश खाण्यात आल्यास त्यातून पसरणाऱ्या जिवाणूजन्य आजारांचा उद्रेक होण्याच्या घटना या आधीही घडलेल्या आहेत. शेलफिशमध्ये आढळणाऱ्या व्हिब्रियो पॅराहॅमोलिटीकस (Vibrio parahaemolyticus) या जिवाणूमुळे दरवर्षी सुमारे ८० हजार जणांना व्हिब्रिऑसिसची बाधा होत असल्याचे ‘सेंटर फॉर डिसीस कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन’ या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. त्यातील व्हिब्रियो व्हल्निफिकस ही वेगळी प्रजाती माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. साधारणपणे दर वर्षी अशा शंभर घटना घडतात.

  • व्हिब्रियो जिवाणूंच्या दोन अन्य प्रजाती ओयस्टर आणि कालवांच्या उबवण प्रक्रियेमध्ये अडथळा आणतात. त्यांच्यामुळे अब्जावधी शेलफिश अळ्या मृत्युमुखी पडल्याने उद्योगाचे मोठे (८० ते १०० टक्क्यापर्यंत) नुकसान होते. पूर्व किनाऱ्यावरील उबवणकेंद्रामध्ये V. tubiashii ही प्रजाती, तर पश्चिम किनारा व हवाई बेटांवरील उबवण केंद्रामध्ये V. coralliilyticus या प्रजातीमुळे नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. या जिवाणूंमुळे कोरल आणि रिफ यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या जिवाणूंच्या नियंत्रणासाठी कार्यक्षम पद्धतीचा अभाव आहे. या जिवाणूंमुळे केवळ उबवण केंद्रातील शेलफीशलाच नव्हे, स्थानिक प्रजातींनाही मोठा फटका बसतो. या समस्येवर मात करण्यासाठी कृषी संशोधन सेवेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गॅरी रिचर्ड आणि तंत्रज्ञ मामयकेल वॉटसन यांनी डेलावरे येथील अन्न सुरक्षा संशोधन केंद्राच्या सहकार्याने काम केले आहे. त्यांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे व्हिब्रियो या जिवाणूंचा नैसर्गिक शत्रू असलेल्या घटकांवर लक्ष केंद्रित केले. या जिवाणूंवर प्रादुर्भाव करणाऱ्या विशिष्ट विषाणूंचा अभ्यास करण्यात येत आहे. जिवाणू हे पृथ्वीवरील बहुतांश सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये आढळतात. अगदी मानवाच्या पचनसंस्थेमध्येही १० हजार अब्ज (१ ट्रीलीयन) जिवाणू सुखनैव राहत असतात. त्यांची संख्या मानवाच्या एकूण पेशींच्याही १० पट अधिक भरते. यातील व्हिब्रियो प्रजातीवर नेमकेपणाने हल्ला करणाऱ्या वैशिष्ठ्यपूर्ण जिवाणूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रिचर्डस यांनी सांगितले.
  • व्हिब्रियो जिवाणूंविरुद्ध कार्य करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा शोध हवाई येथील खोल पाण्यामध्ये लागला आहे. असे असले तरी V. tubiashii या सर्वसामान्यपणे पूर्व किनारपट्टीवर आढळणाऱ्या जिवाणूंच्या नियंत्रणासाठी शोध अद्याप सुरू आहे.
  • सध्या चाचण्या सुरू असून, व्हिब्रियो जिवाणू लवकर प्रतिकारशक्ती विकसित करतात. त्यासाठी एकापेक्षा अधिक शत्रू प्रजातींच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे.  
  • जिवाणूंच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे हे सूक्ष्मजीव प्राणी आणि वनस्पतींसाठी हानिकारक नाहीत. त्यामुळे अॅक्वाकल्चर किंवा अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांचा वापर करणे शक्य असल्याचे रिचर्डस यांनी सांगितले.
  • व्हिब्रियो जिवाणूंसाठी हानिकारक असलेले सूक्ष्मजीव ओयस्टरसाठी हानिकारक नाहीत. तसेच त्यांच्यामध्ये चव, गंध, सातत्य किंवा ताजेपणा यावर कोणताही विपरीत परिणाम करत नाहीत.
  • या घटकांमुळे कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या ओयस्टरचाही स्वाद घेणे शक्य होणार आहे.
  • अन्य शत्रूंचा शोध

  • व्हिब्रियो जिवाणू प्रजातींचे अन्यही अनेक शत्रू प्रजातींचा शोध रिचर्ड आणि वॉटसन घेत आहेत.
  • डेलावरे, अलाबामा, आणि हवाई या तीन प्रदेशातील किनाऱ्यावरील भागामध्ये व्हिब्रियो प्रजातींच्या शत्रू जिवाणू मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यातील नियंत्रणासाठी योग्य गुणधर्मांच्या Pseudoalteromonas piscicida  आणि Halobacteriovorax या दोन गटातील सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत वेगळे केले आहेत. हे घटक मानवामध्ये हानीकारक ठरणाऱ्या व्हिब्रियो प्रजातींना सागरी पाण्यामध्ये लक्षणीयरीत्या रोखू शकत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे शेलफिश प्रक्रिया उद्योगामध्ये डिप्युरेशन तंत्रामध्ये त्यांचा समावेश करणे शक्य होईल.
  • हे तंत्रज्ञान केवळ व्हिब्रियो जिवाणूच नव्हे, तर इ. कोलाय, सॅलमोनेल्ला या शेतीमालांवर येणाऱ्या जिवाणूंसाठीही वापरणे शक्य होईल. त्यासाठी इटली येथील संशोधन सहकारी विश्लेषण करत आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT