खारफुटीतील कार्बन शोषणाचे नेमके प्रमाण ठरेल फायद्याचे
खारफुटीतील कार्बन शोषणाचे नेमके प्रमाण ठरेल फायद्याचे 
मुख्य बातम्या

खारफुटीतील कार्बन शोषणाचे नेमके प्रमाण ठरेल फायद्याचे

वृत्तसेवा

खारफुटीच्या मातीमध्ये कार्बन साठवण्याची क्षमताअसून, त्याचे अचूक मापन करण्यासाठी ल्युझीयाना राज्य विद्यापीठातील संशोधकांनी नवी पद्धती विकसित केली आहे. पूर्वीच्या अनेक संशोधनामध्ये खारफुटीमध्ये उपलब्ध असलेल्या निळ्या कार्बनच्या पातळीकडे दुर्लक्ष केले होते. कार्बन हा पृथ्वीवरील महत्त्वाच्या रासायनिक मूलद्रव्यांपैकी एक आहे. तो वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमध्येही आहे. या वायूंमध्ये होत असलेल्या वाढीमुळे यावर्षी त्याची तीव्रता उच्च पातळीवर पोचली आहे. परिणामी हवामान बदलाचे संकेत मिळत आहेत. समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावरील पर्यावरणातही कार्बन मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याला निळा कार्बन असे म्हणतात. तेथील खारफुटीच्या पर्यावरणालाही निळ्या कार्बनचे पर्यावरण म्हणून ओळखले जाते. त्यात खारफुटी, मिठागरे, समुद्री गवतांचे पट्टे हे एकमेकांशी जोडलेले असून, तो समुद्राचाच एक भाग आहे. या ठिकाणी वातावरणातील कार्बन मोठ्या प्रमाणात जमा होतो. (येथे कर्ब उत्सर्जनापेक्षा ग्रहणाचे प्रमाण अधिक आहे.) जागतिक पातळीवर दक्षिण अमेरिकेत सर्वाधिक ३० टक्के खारफुटीची जंगले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर हा भाग निळ्या कार्बनचा प्रदेश मानला जातो. ब्राझील येथील रोवेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फ्लोरिडा ते अॅमेझॉनच्या दक्षिणेपर्यंतच्या भागातील ३६ खारफुटीतील मातीच्या नमुने गोळा केले असून, त्यातील कार्बनचे प्रमाण मोजले आहे. या आधी झालेल्या अभ्यासामध्ये चुनखडीयुक्त मातीतील ५० टक्क्यांपर्यंत च्या निळ्या कार्बनकडे संशोधकांनी दुर्लक्ष केल्याचे आढळते. अशी खारफूटी फ्लोरिडा आणि कॅरिबियन बेटांवर आढळली. ज्या ठिकाणी त्याचे प्रमाणे ८६ टक्क्यापेक्षा अधिक होते, तिथे त्याकडे अधिक लक्ष दिले.   सुमारे ५७ देशांमध्ये निळ्या कार्बनचा माहितीसाठाच उपलब्ध नाही. त्यामुळे वातावरणातील कर्बाच्या साठवणुकीचे नेमके प्रमाण मिळण्यात अडचणी आहेत. कार्बन फूटप्रिंटचा विचार करताना या निळ्या कार्बनच्या साठवणुकीचाही विचार करण्याची आवश्यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या विषयी माहिती देताना ल्युझीयाना राज्य विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट ट्विले यांनी सांगितले, की जागतिक पातळीवरील किनारावर्ती भागातील कार्बनच्या साठवणीसंबंधी अचूक व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. या भागामध्ये लाटा, नदीचे प्रवाह. भूवैशिष्ट्ये, पाऊस यामुळे अनेक परिणाम होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT